1 00:00:16,667 --> 00:00:20,917 कृपया कॅमेऱ्याकडे पहा, पण शक्य असेल तर एकदा तो तुम्हाला ओलांडून गेल्यावर, सर. 2 00:00:21,000 --> 00:00:23,083 ठीक. एकदा कॅमेरा पाठवून बघू. 3 00:00:23,500 --> 00:00:25,583 -माझा आवाज येतोय, सर? -हो. 4 00:00:26,208 --> 00:00:29,583 -तुम्ही एक मिनिट काहीतरी बोलू शकता का? -कशाबद्दल? 5 00:00:29,959 --> 00:00:32,041 काहीही. आपल्याला फक्त आवाज तपासून पहायचा आहे. 6 00:00:33,083 --> 00:00:36,125 चेक, चेक. वन, टू, थ्री, फोर. चेक. 7 00:00:36,208 --> 00:00:38,041 उत्तम. मिनिटभरात सुरू होईल. 8 00:00:38,333 --> 00:00:40,208 तुम्हाला आमच्या मुख्य स्टुडिओतील चर्चेचा आवाज, 9 00:00:40,291 --> 00:00:41,542 ऐकू येईल, आणि टेड तुमचा परिचय करून देईल. 10 00:00:41,875 --> 00:00:43,458 कृपया, फक्त लेन्समध्ये पाहून बोला. 11 00:00:48,875 --> 00:00:50,959 बरोबर आहे. धन्यवाद. धन्यवाद. 12 00:00:55,000 --> 00:01:00,333 माफ करा. आता हे तेच वकील आहेत जे त्यांच्या सेवा विनामूल्य देत होते. 13 00:01:03,583 --> 00:01:05,500 कृपया मला... माझं बोलून तर होऊ द्या, मॅम. 14 00:01:09,542 --> 00:01:11,709 क्षमा करा. मला तुम्ही दिसत नाही आहात. 15 00:01:13,834 --> 00:01:15,959 ठीक, मी तर पीपर प्रकरणात अजिबात सामील नव्हतो, 16 00:01:16,041 --> 00:01:21,709 पण मला वाटतं की बचाव पक्षाच्या वकीलाची चूक झाल्याने विरोधी पक्षाला एक मुद्दा मिळाला. 17 00:01:25,083 --> 00:01:26,125 धन्यवाद, सर. 18 00:01:26,917 --> 00:01:28,417 बस इतकंच? 19 00:01:28,500 --> 00:01:30,750 हो. मी एका सेकंदात येऊन तुम्हाला मोकळं करतो. 20 00:01:42,125 --> 00:01:43,208 माफ करा. 21 00:01:46,917 --> 00:01:48,375 -काय? -काल रात्रीचा कार्यक्रम. 22 00:01:48,458 --> 00:01:51,792 -तुम्ही खूपच चांगले बोललात. -धन्यवाद. डायेन? ज्युलियस? 23 00:01:51,875 --> 00:01:53,792 तुमच्या ऑफीसमध्ये. आणि इथे ही तुम्हाला भेटायला 24 00:01:53,875 --> 00:01:55,333 कुणीतरी आलंय. मी त्यांना बैठकीच्या खोलीत बसवलंय. 25 00:01:55,417 --> 00:01:57,417 -कोण? -मला नाही माहीत. कुणीतरी डेल वगैरे? 26 00:02:00,125 --> 00:02:02,834 -शुभ प्रभात. -मग, मि. जेफ्री टूबिन, कसं काय होतं सगळं? 27 00:02:03,083 --> 00:02:08,000 एकदम वेगात. आणि ते, बैठकीच्या खोलीत कोण आहे? 28 00:02:08,083 --> 00:02:10,959 डेल कुझ्मा, पीपर न्यूजचे संपादक. 29 00:02:12,542 --> 00:02:13,458 बाप रे. 30 00:02:14,667 --> 00:02:17,834 मी काल रात्रीच पीपरबद्दलच बोललो होतो. तो आता जाम भडकलेला असेल. 31 00:02:17,917 --> 00:02:20,500 पुढच्या वेळी जर त्यांनी कायदेपंडीत म्हणून मला बोलावलं, 32 00:02:20,583 --> 00:02:21,583 मला "नाही" म्हणून कळव. 33 00:02:23,458 --> 00:02:25,542 थांब, थांब, थांब. आपल्याला लुकाबद्दल बोलायचं होतं. 34 00:02:26,875 --> 00:02:28,709 ती गर्भवती आहे का असं आपण तिला विचारू शकत नाही. हे अनैतिक आहे. 35 00:02:28,792 --> 00:02:30,333 आणि लुका तर काहीही सांगत नाहीये. 36 00:02:30,417 --> 00:02:33,083 नाही, पण दोन महिन्यांतच तिच्याकडे मार्कोनी प्रकरण पण चालणार आहे, 37 00:02:33,166 --> 00:02:35,667 तेव्हा आपल्याला जर काही बदल करायचा असेल तर तो आत्ताच करावा लागेल. 38 00:02:35,750 --> 00:02:37,875 त्यामुळेच ती काहीही बोलत नसावी. 39 00:02:37,959 --> 00:02:40,875 ह्यावर्षीचे सगळ्यात मोठे प्रकरण सोडून तिला दुय्यम खुर्चीवर अजिबात बसायचं नाहीये. 40 00:02:40,959 --> 00:02:42,792 ठीक, मी तिची मैत्रिण मायाशी बोलतो. 41 00:02:42,875 --> 00:02:44,750 बाळंतपणाची तारीख काय असेल हे तरी किमाना ती आपल्याला सांगू शकेल. 42 00:02:45,792 --> 00:02:46,667 मी जरा... 43 00:02:48,375 --> 00:02:51,041 मग, माझ्या प्रकरणाबद्दल आणि तुम्ही जे बोलला होता त्याच्या संदर्भावरून... 44 00:02:51,125 --> 00:02:53,417 हे पहा, मी काहीही बोलयला नको होतं. 45 00:02:53,500 --> 00:02:54,709 आणि हे तुम्ही आणि तुमचे वकील यांच्यातच राहतं. 46 00:02:54,792 --> 00:02:56,750 मी माझ्या वकिलांना हाकलून दिलंय. मला तुम्ही हवे आहात. 47 00:02:57,792 --> 00:02:58,667 काय म्हणालात? 48 00:02:58,750 --> 00:03:00,917 मला तुम्ही माझे नवे वकील म्हणून हवे आहात. 49 00:03:01,000 --> 00:03:04,166 -तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे? -तुमच्या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. 50 00:03:04,250 --> 00:03:06,208 नाही, आमची फक्त प्राथमिक मांडणी झालीयं. 51 00:03:06,291 --> 00:03:08,291 सुनावणीच्या तयारीसाठी तर कैक महिन्यांचा कालावधी लागेल. 52 00:03:08,375 --> 00:03:10,750 आणि माझी वक्तव्यं, तुमच्या वकिलांबद्दल मी केलेल्या टिप्पणी, 53 00:03:10,834 --> 00:03:14,750 -त्याचं एवढं काही नाही. -पण... ते खरं होतं का? 54 00:03:16,375 --> 00:03:20,000 हां, काही गोष्टी असण्याची शक्यता आहे ज्या मला पण माहिती नाहीत. 55 00:03:20,083 --> 00:03:21,375 तुम्हाला कुणी सांभाळून घेणारा वगैरे हवा आहे का? 56 00:03:21,458 --> 00:03:23,542 न्यायाधीश इतकं पाणी पुलाखालून वाहून गेल्यावर 57 00:03:23,625 --> 00:03:24,834 आता वकील बदलण्यासाठी परवानगी देणारच नाहीत. 58 00:03:24,917 --> 00:03:27,291 ते देतील. त्यांनाही माझ्या सध्याच्या वकिलाचा फार राग येतो. 59 00:03:28,000 --> 00:03:31,625 ठीक आहे. हाच तर वाईटाचा चांगल्याशी होणारा संघर्ष आहे. 60 00:03:32,583 --> 00:03:34,709 -चांगल्याला सामील व्हा. -हां, बरोबर आहे. 61 00:03:36,542 --> 00:03:38,875 -काय झालं? -तुम्हाला भेटायला अजून कुणीतरी आलंय इथे. 62 00:03:39,166 --> 00:03:41,667 लोक काय आधी वेळ घ्यायचं विसरले आहेत की काय आजकाल? आता कोण आहे? 63 00:03:41,750 --> 00:03:45,041 -फ्रँझ मेंडेलसन? -फ्रँझ मेंडेलसन इथे आले आहेत? 64 00:03:45,125 --> 00:03:46,959 प्रतिक्षालयात वाट पाहताहेत. कोण आहेत ते? 65 00:03:47,041 --> 00:03:48,917 हे, ईश्वरा. त्यांना आपल्याला विकत घ्यायचं होतं. 66 00:03:49,000 --> 00:03:50,959 नाही, त्यांनी आधीच स्टॅनले आणि ग्लेडहिलना विकत घेतलंय. 67 00:03:51,041 --> 00:03:54,458 मग? हेच त्यांचं काम आहे. ते लहानसहान संस्था गिळत राहतात. 68 00:03:54,542 --> 00:03:55,375 त्यांचं काय काम आहे ह्याबद्दल काही बोलले का ते? 69 00:03:55,458 --> 00:03:56,667 नाही. मी विचारून येऊ का? 70 00:03:56,750 --> 00:03:57,667 नको. 71 00:03:58,625 --> 00:04:00,917 कारण मीच नाही म्हणालो. मला ते स्वतःच माझ्या 72 00:04:01,000 --> 00:04:03,333 ग्राहकांसोबत करायचं असतं, आणखी एक शून्य वाढवणं. 73 00:04:04,417 --> 00:04:09,041 मला गेलं पाहिजे. मि. बोसमन, नमस्कार.. फ्रँझ मेंडेलसन. 74 00:04:09,125 --> 00:04:10,542 -तुम्हाला भेटून आनंद झाला. -आपण पुर्वी कधी भेटलो नाही? 75 00:04:10,625 --> 00:04:14,583 -शिकागोत असून आपण कधी भेटलोच नाही? -माझ्या मते आपली वर्तुळं वेगवेगळी आहेत. 76 00:04:14,667 --> 00:04:18,208 हो, आता आपण सगळे एकाच वर्तुळात आहोत. आणि, डायेन लोखार्ड, तुम्हाला मी ओळखतो. 77 00:04:18,291 --> 00:04:20,250 फ्रँझ, नमस्कार. तुम्ही इतके छान आहात हे पाहून आनंद वाटला. 78 00:04:20,333 --> 00:04:23,625 नाही, फार चांगला नाही. काळ थोडा विचित्र आहे. आणि तुम्ही ज्युलियस केन, बरोबर? 79 00:04:23,709 --> 00:04:24,750 बरोबर. नमस्कार. 80 00:04:25,000 --> 00:04:27,458 मी आधी वेळ घेऊन न आल्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. 81 00:04:27,542 --> 00:04:28,709 काहीच हरकत नाही. 82 00:04:28,792 --> 00:04:31,208 पण मी आज तुमची क्लिप ऑनलाईन बघितली ऍड्रियन, 83 00:04:31,291 --> 00:04:34,417 आणि मी म्हणालो, "असं कुणीतरी मला आपल्यासोबत पाहिजे." 84 00:04:34,500 --> 00:04:37,917 माझी क्लिप? मला नव्हतं माहीत माझी क्लिप पण आहे. 85 00:04:38,000 --> 00:04:39,125 आणि त्याला तीन लाख लोकांनी पसंत केलंय. 86 00:04:39,709 --> 00:04:41,667 -एक मिनिट आहे का तुमच्याकडे? -नक्कीय, बोला. 87 00:04:41,750 --> 00:04:42,625 धन्यवाद. 88 00:04:45,291 --> 00:04:48,000 आधी, मला हे सांगू द्या की मी इथे का आलो. 89 00:04:48,083 --> 00:04:49,834 -फ्रँझ, कृपया बसून घ्या. -नाही, ठीक आहे. 90 00:04:49,917 --> 00:04:51,625 -मला गतिमान रहायला आवडतं. -मला पण. 91 00:04:51,709 --> 00:04:54,834 अच्छा, मग चला आपण एकमेकांना पिंजऱ्यातल्या श्वापदांसारखं वेढून टाकू. 92 00:04:56,667 --> 00:04:59,375 मला खात्री आहे की, तुम्ही गेल्या आठवड्यातच विल्क 93 00:04:59,458 --> 00:05:00,917 हॉबसनने केलेल्या आत्महत्येबद्दल ऐकलंच असेल. 94 00:05:01,000 --> 00:05:02,166 हो, फारच भयंकर होतं. 95 00:05:02,250 --> 00:05:04,291 पण तुम्हाला माहीत आहे का की, त्याच्या भागीदारांनी 96 00:05:04,375 --> 00:05:06,291 पोलिसांच्या अहवालाला सहमती दर्शवली नाही? 97 00:05:06,667 --> 00:05:10,500 त्यांना वाटतंय की, हा त्याच प्रकारचा एक खून आहे, 98 00:05:10,583 --> 00:05:13,375 पिडलेल्या अशिलाने आणखी एका वकिलाचा केलेला खून. 99 00:05:13,458 --> 00:05:16,458 आता, गेल्या काही आठवड्यांपासून सर्वोच्च सहा 100 00:05:16,542 --> 00:05:18,500 संस्था ह्याबद्दल एकत्र येऊन बैठका घेताहेत 101 00:05:18,583 --> 00:05:21,542 आणि ही अडचण सोडवण्याकरिता चर्चा करताहेत. 102 00:05:21,625 --> 00:05:23,709 रॉजर हिलला एका गाडीने उडवला, 103 00:05:23,792 --> 00:05:28,083 डॅन ऑक्सेनबोल्डला गोळ्या घातल्या गेल्या आणि आता विल्क हॉबसन. 104 00:05:28,500 --> 00:05:31,125 आम्हाला वाटतं की तुम्ही पुढच्या बैठकीला यावं. 105 00:05:31,208 --> 00:05:33,500 पण आम्ही तर सर्वोच्च सहांपैकी एक नाही आहोत. 106 00:05:33,583 --> 00:05:36,166 खरंय, पण ऍड्रियन, आम्ही गेल्या आठवड्यात तुला केबल, 107 00:05:36,250 --> 00:05:38,041 न्यूजवर पाहिलं आणि आम्ही फारच प्रभावित झालो. 108 00:05:38,125 --> 00:05:41,458 तेव्हा आम्ही एकमताने आणखी एका संस्थेला बोलावण्याचा निर्णय घेतला, तुझ्या. 109 00:05:41,542 --> 00:05:42,792 ह्या बैठका नेमक्या कशाबद्दल आहेत? 110 00:05:43,875 --> 00:05:47,750 आपल्या जगण्याला आणि जीवाला उद्भवलेल्या धोक्याबाबत. 111 00:05:48,125 --> 00:05:50,458 शिकागोच्या वकिलांची हत्या केली जात आहे, 112 00:05:50,542 --> 00:05:53,750 आणि सगळेच जण आपल्या मदतीसाठी वकिलांवर केले जाणारे विनोद करण्यात व्यस्त आहेत. 113 00:05:53,917 --> 00:05:58,375 सहानुभूती कुणालाच वाटत नाही, तेव्हा आता आपल्यालाच काही तरी केलं पाहिजे. 114 00:06:05,291 --> 00:06:07,875 -आदर. -कठीण काळ आहे. 115 00:06:09,583 --> 00:06:14,250 सातां पैकी एक फर्म? काल रात्री तू नेमकं काय बोललास बातम्यांमध्ये? 116 00:06:14,333 --> 00:06:18,959 मला ठाऊक नाही. मी तर... मला वाटले तो मूर्खपणा होता. 117 00:06:19,041 --> 00:06:21,792 तुम्ही खूप चांगलं बोललात. तुम्ही एकदा बघा तर. 118 00:06:22,250 --> 00:06:24,583 वकिलांबाबत हे बऱ्याच दिवसांपासून होण्याची शक्यता होतीच. 119 00:06:24,667 --> 00:06:27,417 जर त्यांनी थोडं आजूबाजूलाही पाहिलं, तर कदाचित चांगलं होईल. 120 00:06:27,500 --> 00:06:31,458 माफ करा. हे तेच वकील आहेत जे त्यांच्या सेवा अगदी विनामूल्य द्यायचे. 121 00:06:31,709 --> 00:06:32,875 अच्छा, तुम्ही चांगले दिसताहात. 122 00:06:32,959 --> 00:06:35,709 डोकं मोठं आहे ना. मोठ्या डोक्यांचे लोक दूरचित्रवाणीवर चांगलेच दिसतात. 123 00:06:36,583 --> 00:06:39,709 -कृपया माझं पूर्ण होऊ द्या, मॅम. -माफ करा, मी काही "मॅम" नाहीये. 124 00:06:40,917 --> 00:06:43,458 क्षमा करा. मला तुम्ही दिसत नाही. 125 00:06:43,542 --> 00:06:46,166 ठीक, 30 सेकंद. ऍड्रियन, पीपरन्यूज डॉट कॉमच्या 126 00:06:46,250 --> 00:06:47,792 नुकत्याच न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये, 127 00:06:47,875 --> 00:06:49,875 नुकत्याच झालेल्या न्यायिक घडामोडींबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 128 00:06:49,959 --> 00:06:52,458 तसं पाहिलं तर माझा पीपर न्यूज प्रकरणाशी काही संबंध नाही, 129 00:06:52,542 --> 00:06:54,458 पण मला वाटतं की, बचाव पक्षाची चूकच झाली की त्यांनी 130 00:06:54,542 --> 00:06:57,083 विरोधी पक्षाला लढण्यासाठी मुद्दा बहाल केला. 131 00:06:57,166 --> 00:06:58,375 त्यांनी तुला पुन्हा भेटण्यासाठी वगैरे बोलावलंय का? 132 00:06:58,458 --> 00:07:00,917 ह्या आठवड्यात. मी त्यांना नाही सांगितलं. 133 00:07:01,000 --> 00:07:02,542 ...पहिल्या घटना दुरुस्तीनुसार पाहिलं तर, 134 00:07:02,625 --> 00:07:03,834 म्हणजे मला असं म्हणायचंय की, ही काही पहिलीच... 135 00:07:03,917 --> 00:07:05,625 धन्यवाद मि. बोसमन. 136 00:07:06,625 --> 00:07:09,417 कदाचित तू पुन्हा विचार करून पाहशील. गोर व्हायडल काय म्हणाले हे तर तुला माहीतच आहे. 137 00:07:10,000 --> 00:07:12,917 शहाण्याने कधी लैंगिक सुखाची आणि दूरचित्रवाणीवर झळकण्याची संधी सोडू नये. 138 00:07:14,583 --> 00:07:15,667 ठीक. 139 00:07:32,875 --> 00:07:35,333 वकिलांबाबत हे होण्याची शक्यता बऱ्याच दिवसांपासून होती. 140 00:07:37,291 --> 00:07:42,125 -बसण्यासाठी जागाच मिळाली नाही का? -मी खूप उशीरा इथे आले. 141 00:07:42,208 --> 00:07:44,959 बरं मला एक सांग. लुका तुझ्याशी काही बोलली का? 142 00:07:45,333 --> 00:07:49,500 -कशाबद्दल? -तिच्या... अवस्थेबद्दल. 143 00:07:54,333 --> 00:07:57,041 -नाही. -तुला वाटतं ती बोलेल? 144 00:07:57,125 --> 00:07:59,583 मला वाटतं तिला आपण तिच्याकडे एक वकील म्हणून 145 00:07:59,709 --> 00:08:02,834 पहायला हवं आहे, होणारी आई म्हणून नव्हे. 146 00:08:05,083 --> 00:08:06,000 अच्छा. 147 00:08:11,250 --> 00:08:13,792 मार्कोनी प्रकरणातील पुढची पूर्व-सुनावणी कधी आहे? 148 00:08:13,875 --> 00:08:17,500 -परवा. -अच्छा. तू ती सुनावणी बघ. 149 00:08:20,792 --> 00:08:25,625 -मि. के? त्याची प्रमुख लुका आहे. -हो, पण ह्या सुनावणीपुरती नाही. 150 00:08:25,709 --> 00:08:27,667 -तेवढ्यापुरतं तू बघ. -का? 151 00:08:27,750 --> 00:08:30,041 मी एक भागीदार आहे. तू एक सहकारी आहेस. मला वाटतं की तू पहावंस, म्हणून. 152 00:08:30,125 --> 00:08:33,166 -थांबा, हे लुकाच्या परिस्थितीमुळे आहे का? -नाही. 153 00:08:33,417 --> 00:08:35,583 हे तुला प्रमुखपद देण्याच्या आमच्या इच्छेमुळे आहे. 154 00:08:36,542 --> 00:08:37,500 लुकाला हे ठाऊक आहे का? 155 00:08:38,542 --> 00:08:39,417 नाही. 156 00:08:40,542 --> 00:08:41,750 तू जाऊन सांग तिला. 157 00:08:50,959 --> 00:08:51,834 अजूनही जागा मिळाली नाही का? 158 00:08:52,166 --> 00:08:53,792 नाही. मी... मला काही हरकत नाही. उलट मला कोपऱ्यात बसायला आवडतं. 159 00:08:53,875 --> 00:08:58,667 -गस्त घालून आल्यापासून तू थोडी बदललीयेस. -नाही, मी तर तशीच आहे, अगदी तश्शीच. 160 00:08:59,000 --> 00:09:02,333 मग, मला वाटतं की आपण हा डीओजेचा मुद्दा त्यांच्याविरुद्ध वापरू शकतो 161 00:09:02,417 --> 00:09:03,667 मार्कोनीच्या पुढच्या सुनावण्यांमध्ये. 162 00:09:04,083 --> 00:09:05,333 मी त्यांच्या कामाच्या ढिगाऱ्याकडे पहात होते, 163 00:09:05,417 --> 00:09:08,750 त्यांनी त्यांच्या एकूणच प्रकरणांमध्ये 70 टक्के वेळा पुढची तारीखच मागितलेली आहे. 164 00:09:08,834 --> 00:09:11,083 नुकतंच ज्युलियसने मला पुढच्या तारखेला हे प्रकरण सांभाळायला सांगितलंय. 165 00:09:11,792 --> 00:09:12,750 काय? 166 00:09:12,834 --> 00:09:16,291 ज्युलियसने मला मार्कोनी प्रकरणात पुढच्या सुनावणीचं काम बघायला सांगितलंय. 167 00:09:17,000 --> 00:09:18,625 -का? -त्याने काही सांगितलं नाही. 168 00:09:19,208 --> 00:09:23,750 पण तो तुझ्या परिस्थितीबद्दल बोलत होता. 169 00:09:26,083 --> 00:09:27,041 अरे, काय फालतूपणा आहे. 170 00:09:27,125 --> 00:09:28,500 त्यांना फक्त जाणून घ्यायचंय की हे फक्त... 171 00:09:28,583 --> 00:09:30,208 काय जाणून घ्यायचंय? ही माझी वैयक्तिक बाब आहे. 172 00:09:30,291 --> 00:09:32,750 हो, आहेच. तुझं बरोबर आहे. ही तुझी वैयक्तिक बाब आहे. 173 00:09:32,834 --> 00:09:36,000 पण तू साधं मला सुद्धा सांगितलं नाहीस, मी तर तुझी मैत्रीण आहे. 174 00:09:39,083 --> 00:09:41,417 मी गर्भवती आहे. माझ्या पोटात बाळ आहे. 175 00:09:42,500 --> 00:09:45,208 -अभिनंदन! -धन्यवाद. 176 00:09:46,542 --> 00:09:49,500 झालं ना, आता माझ्या तोंडून हे शब्द शेवटी निघाले बाहेर. 177 00:09:50,667 --> 00:09:51,750 हे सांगायला खूप विचित्र वाटतं. 178 00:09:51,834 --> 00:09:54,000 पण तुला माहितीये का? तू ते छान बोलतेस. 179 00:09:56,959 --> 00:10:00,500 आता इथे दुसरी एक भीती आहे. मी भागीदार होण्याच्या मार्गावर आहे. 180 00:10:00,709 --> 00:10:04,083 माझ्या करियरमध्ये पहिल्यांदा मी काहीशा अडचणीत आहे. 181 00:10:06,250 --> 00:10:09,959 आणि आता मला काळजी वाटतेय की, ते कोंडी करण्याकरिता ह्या गोष्टीचा फायदा घेतील. 182 00:10:10,041 --> 00:10:12,041 ते नाही घेऊ शकत... कायद्याने तरी. 183 00:10:12,792 --> 00:10:17,041 हे पहा, तू जर त्यांना सांगितलं नाहीस तर त्यांच्यासाठी तुला मागे ओढणं सोपं जाईल. 184 00:10:17,125 --> 00:10:19,333 आणि मग ते सरळ म्हणू शकतील की हे कामगिरीमुळे झालंय. 185 00:10:19,834 --> 00:10:22,041 तू तुझं गर्भारपण सगळ्यांना सांगितलं पाहिजेस. 186 00:10:23,959 --> 00:10:26,834 -हा चांगला मुद्दा आहे. -मग जाऊन त्यांना सांग. 187 00:10:28,208 --> 00:10:29,166 "दिवाणी न्यायालय" 188 00:10:30,583 --> 00:10:32,542 आणि आपण इथेच आहोत... पुन्हा एकदा. 189 00:10:33,667 --> 00:10:36,458 मिस. लुत्झ. कशा आहात? 190 00:10:36,917 --> 00:10:39,083 प्रत्येक वेळी जेव्हा एका वकिलाची हत्या होते, 191 00:10:39,166 --> 00:10:40,000 तेव्हा माझ्या मनात तुमचाच विचार येतो. 192 00:10:40,083 --> 00:10:42,834 आणि जेव्हा पण एखाद्या खुन्याला अटक होते, तेव्हा मला तुमचीच आठवण येते. 193 00:10:44,250 --> 00:10:47,250 आपल्यात बरंच साम्य आहे म्हणा की. संघर्षाला तयार? 194 00:10:47,542 --> 00:10:50,250 सगळं ठीक आहे. अगदी इथेही. 195 00:10:50,333 --> 00:10:52,583 कुक काउंटीमधील सर्किट कोर्टाची ही शाखा 196 00:10:52,667 --> 00:10:55,250 आता जरी चालू असली तरी बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे. 197 00:10:55,333 --> 00:10:56,208 माननीय न्यायाधीश... 198 00:10:56,291 --> 00:10:59,166 सुस्वागतम, सज्जनांनो. कृपया सुरू करा. 199 00:11:02,583 --> 00:11:05,208 आता, मी तुम्हाला तुम्ही काय पाहणार आहात ह्यासाठी तयार करू इच्छितो. 200 00:11:05,667 --> 00:11:08,458 सुनावणी म्हणजे दूरचित्रवाणीवर पहायला मिळतं तसं काहीही नाही. 201 00:11:08,709 --> 00:11:10,583 न्यायप्रक्रिया ही मंदगतीने होत असते. 202 00:11:10,667 --> 00:11:13,083 इथे 60 मिनिटांमध्ये कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही. 203 00:11:13,291 --> 00:11:15,625 आता, दूरचित्रवाणीवर वकिलांच्या कर्तृत्वाचा आनंद लुटणे ही निराळी, 204 00:11:15,709 --> 00:11:19,125 बाब आहे, पण वास्तवात वकील फार कमी वेळा न्यायालयात जातात. 205 00:11:19,208 --> 00:11:24,166 खरं म्हणजे, कुठल्याही प्रकरणाचा 90 भाग हा कागदोपत्रीच असतो. 90 टक्के... 206 00:11:26,291 --> 00:11:27,834 -नमस्कार. -तुम्ही कोण आहात? 207 00:11:28,041 --> 00:11:31,125 -मि. ऍड्रियन बोसमन. -आणि मिस. डायेन लॉखार्ट. 208 00:11:31,208 --> 00:11:33,375 बचावपक्षाला वकिलांमध्ये बदल करायचा आहे. 209 00:11:33,458 --> 00:11:34,709 कृपया बाजूला या. 210 00:11:36,709 --> 00:11:39,333 हे तुम्ही कधी काळी दूरचित्रवाणीवर जे पाहिलं त्याचं उदाहरण असेल 211 00:11:39,417 --> 00:11:42,000 जिथे वकील न्यायाधीशांना कसल्याशा गोष्टीची विनंती करतात. 212 00:11:42,083 --> 00:11:45,166 पण माझ्यावर विश्वास ठेवा, हे दूरचित्रवाणीइतकं मनोरंजक निश्चितच नाही. 213 00:11:46,000 --> 00:11:48,250 न्यायाधीश महोदय, बचाव पक्षाला कामकाज सुरू 214 00:11:48,333 --> 00:11:50,041 व्हायच्या आतच त्यात अडथळा आणायचा आहे असं दिसतंय. 215 00:11:50,125 --> 00:11:54,709 महोदय, मि. कुझ्मांनी आधी विचारलं होतं की, त्यांना त्यांचा आधीचा वकील बदलायचा आहे. 216 00:11:54,792 --> 00:11:56,542 आता, बचाव पक्षाला ही परवानगी मिळाली पाहिजे की... 217 00:11:56,625 --> 00:11:58,834 त्यांना त्यांच्या निवडीनुसार प्रतिनिधित्व ठरवण्याची. 218 00:11:58,917 --> 00:11:59,750 संधी दिली गेली होती. नक्कीच दिली गेली होती. 219 00:11:59,834 --> 00:12:02,792 -आता त्यांचा विचार बददला आहे. -बचाव पक्ष त्यांचे वकील निवडू शकतो, 220 00:12:02,875 --> 00:12:06,000 पण मी ह्या संगीत खुर्चीच्या खेळाला अजिबात मान्यता देणार नाही. 221 00:12:06,083 --> 00:12:07,542 -समजलं? -हो, महोदय. 222 00:12:07,625 --> 00:12:10,875 समजलं, महोदय. आम्हाला पुढची तारीख हवी आहे. 223 00:12:10,959 --> 00:12:11,875 ती तर तुम्हाला हवीच आहे. 224 00:12:12,250 --> 00:12:15,375 आम्ही नुकतेच मि. कुझ्मांचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली असल्याने, 225 00:12:15,542 --> 00:12:18,625 सुनावणीकरिता व्यवस्थित तयारी करण्यासाठी आम्हाला किमान... 226 00:12:18,709 --> 00:12:22,000 आमचा आक्षेप आहे. न्यायमंडळ आलेलं आहे. सुनावणी सुरू आहे. 227 00:12:22,083 --> 00:12:23,083 मान्य. 228 00:12:24,041 --> 00:12:26,792 इतके सगळे वकील मारले गेले असताना, 229 00:12:26,875 --> 00:12:29,041 माझ्या न्यायालयात इतके शिल्लक राहिले हे कसं काय ना? 230 00:12:30,417 --> 00:12:32,083 आगीत सगळं काही नष्ट झालं. 231 00:12:32,625 --> 00:12:36,875 माझ्या आईने माझ्यासाठी ठेवलेला पियानो, माझ्या चित्रांचा संग्रह. 232 00:12:36,959 --> 00:12:39,250 आणि हे तुमचे घर होते का, मिसेस हनीकट? 233 00:12:39,333 --> 00:12:40,208 हो. 234 00:12:40,458 --> 00:12:42,375 आणि हे तुमचे नंतरचे घर का? 235 00:12:44,750 --> 00:12:46,041 न्यायालयाने हे लक्षात घ्यावं की 236 00:12:46,125 --> 00:12:49,500 ह्या ठिकाणी मिसेस हनीट ह्या भावनावश होऊन हो म्हणताहेत. 237 00:12:49,667 --> 00:12:52,750 आणि... क्षमा करा, मिसेस हनीकट. आणखी एकच प्रश्न. 238 00:12:53,583 --> 00:12:54,709 हा तुमचा कुत्रा आहे का? 239 00:12:57,000 --> 00:12:59,208 -हे ईश्वरा. -हो. 240 00:12:59,291 --> 00:13:01,875 आणि तो आगीत मरण पावला, हो ना? 241 00:13:02,417 --> 00:13:03,500 हो. 242 00:13:03,709 --> 00:13:05,125 आणि ह्या आगीसाठी तुम्ही कुणाला दोषी ठरवाल? 243 00:13:05,208 --> 00:13:08,125 आक्षेप आहे, महोदय. भडकाऊ प्रकारचा संवाद, निष्कर्ष विचारणारा. 244 00:13:08,208 --> 00:13:10,917 ठीक, निष्कर्ष हाच सुनावणीचा गाभा असतो, हो ना? 245 00:13:11,166 --> 00:13:13,333 तरी पण, मी न्यायमंडळाला सचेत करू इच्छितो. 246 00:13:16,333 --> 00:13:18,750 न्यायमंडळातील सज्जनांनो, सुनावणी ही 247 00:13:18,834 --> 00:13:21,041 दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाइतकी मनोरंजक कधीही नसते. 248 00:13:21,125 --> 00:13:23,583 इथे आपण 60 मिनिटांमध्ये सगळं काही गुंडाळू शकत नाही. 249 00:13:23,667 --> 00:13:25,834 त्यामुळे केवळ साक्षीदाराने बचाव पक्षाकडे निर्देश 250 00:13:25,917 --> 00:13:28,208 केल्याने ते सत्य आहे हे सिद्ध होत नाही. 251 00:13:28,542 --> 00:13:30,000 कृपया ह्या गोष्टीचं भान ठेवा. 252 00:13:31,625 --> 00:13:33,417 मिसेस. हनीकट, तुम्ही पुढे बोलू शकता. 253 00:13:33,625 --> 00:13:36,125 मी त्याला आणि त्याच्या संकेतस्थळाला दोष देईन. 254 00:13:36,208 --> 00:13:37,917 -पण त्याने आग नाहीच का लावली? -नाही. 255 00:13:38,000 --> 00:13:39,834 पण त्याने आमच्या घराचा पत्ता छापला आणि म्हणाला की, 256 00:13:39,917 --> 00:13:42,917 जे काही होतंय ते व्हावं हीच आपली योग्यता आहे. 257 00:13:43,375 --> 00:13:47,709 -हेच आहे ते साधर्म्य. -धन्यवाद. माफ करा, मिसेस हनीकट. 258 00:13:49,250 --> 00:13:50,458 त्या कुत्र्याचं नाव काय होतं म्हणालात? 259 00:13:53,166 --> 00:13:54,166 पफी. 260 00:13:55,208 --> 00:13:59,000 -तुम्हाला परत कधी पफी सापडला का? -नाही. 261 00:14:06,500 --> 00:14:08,917 ती तुला उकसवायचा प्रयत्न करतेय. त्या फंदात पडू नकोस. 262 00:14:10,959 --> 00:14:14,792 मिसेस हनीकट, तुमच्यासोबत जे घडलं त्याबद्दल मी खरंच दिलगीर आहे. 263 00:14:16,083 --> 00:14:19,208 मिस अँबर वुड लित्झच्या शेजारी बसलेले ते कोण आहेत? 264 00:14:19,458 --> 00:14:21,250 तो माझा मुलगा आहे, डेनिस. 265 00:14:21,333 --> 00:14:24,083 आणि तुमचा मुलगा, डेनिस, तुमच्यासोबतच राहतो, हे खरं आहे का? 266 00:14:24,166 --> 00:14:25,083 सध्यापुरतं तरी हो. 267 00:14:25,166 --> 00:14:27,583 आणि जे घर नष्ट केलं गेलं त्यात सुद्धा तो तुमच्यासोबत राहत होता? 268 00:14:27,667 --> 00:14:30,083 तो मला माझ्या कमरेचं ऑपरेशन झाल्यापासून मदत करत होता. 269 00:14:30,166 --> 00:14:33,166 आणि तुमचा मुलगा, डेनिस हा नव-नाझीवादी होता, हे खरं आहे का? 270 00:14:33,250 --> 00:14:36,500 -आक्षेप. प्रक्षोभक. -खरं नसेल तर त्या नाही म्हणून शकतात. 271 00:14:36,583 --> 00:14:38,500 तरी पण हा प्रश्न ह्या आगीच्या प्रकरणात संयुक्तित नाही. 272 00:14:38,583 --> 00:14:40,333 हा प्रश्न माझ्या अशिलाने ह्या लोकांचा पत्ता 273 00:14:40,417 --> 00:14:41,250 का छापला ह्या संदर्भात तरी संयुक्तिकच आहे... 274 00:14:41,333 --> 00:14:42,166 महोदय... 275 00:14:42,250 --> 00:14:45,125 ...आणि त्यासाठीच तर त्यांच्यावर हा दावा गुदरला आहे. 276 00:14:50,834 --> 00:14:55,000 ह्या छनकाछनकीबद्दल क्षमस्व. इथे कधी कधी गोष्टी हातघाईवरही येतात. 277 00:14:57,625 --> 00:14:59,792 अमान्य. तुम्ही उत्तर देऊ शकता. 278 00:15:00,583 --> 00:15:04,583 माझा मुलगा खूप चांगला आहे. तो खूप कष्ट करतो, खूप वाचन करतो. 279 00:15:04,667 --> 00:15:08,792 आणि तो अजिबात नाझी नाही, नव वगैरे किंवा कसल्याही प्रकारे. 280 00:15:08,875 --> 00:15:10,917 पण तो ओक वुड्सच्या कॉन्फेडरेट सोल्जर 281 00:15:11,000 --> 00:15:12,959 पुतळ्याच्या आंदोलनात सहभागी झाला नव्हता का? 282 00:15:13,041 --> 00:15:14,959 हो, पण केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमीकरिता म्हणून. 283 00:15:16,125 --> 00:15:18,458 हा डेनिसचाच फोटो आहे ना, मिसेस हनीकट? 284 00:15:18,542 --> 00:15:21,291 हो, पण तो सगळ्यांना थांबवण्यासाठी ओरडतो आहे. 285 00:15:22,000 --> 00:15:23,333 मिसेस हनीकट... 286 00:15:25,041 --> 00:15:29,250 हा सगळ्यांना थांबवणाऱ्या माणसाचा चेहरा वाटतो का तुम्हाला? 287 00:15:34,041 --> 00:15:35,166 तीन लाख. 288 00:15:36,583 --> 00:15:38,333 न्यायालयात काय झालं हे पाहिलं नाही का तुम्ही? 289 00:15:38,875 --> 00:15:40,333 न्यायमंडळाची पूर्ण सहानुभूती आहे तिला. 290 00:15:40,417 --> 00:15:42,834 हो, पण त्यांना तिच्या मुलाबद्दल घृणा सुद्धा वाटते. 291 00:15:43,917 --> 00:15:46,625 तीन लाख. मला वाटतं घर पुन्हा बांधायला तेवढे पुरेसे आहेत. 292 00:15:47,125 --> 00:15:50,709 नाही, 10.5 दशलक्ष. झालेल्या त्रास आणि हालअपेष्टांसाठी. 293 00:16:14,500 --> 00:16:16,208 ईश्वरा, सगळेच आहेत. 294 00:16:16,875 --> 00:16:19,291 ज्यांनी मला कधीही काही काम दिलं नाही. 295 00:16:19,792 --> 00:16:22,208 ओह, ते पहा, एल्विस व्हाईट. 296 00:16:23,083 --> 00:16:26,250 आणि रॉजर वुडरफ. त्याने मला दोनदा हरवलंय. 297 00:16:27,792 --> 00:16:30,959 हे तर अशा दुःस्वप्नाच्या प्रारंभासारखं आहे ज्यात, मला वाटतं, मी विवस्त्र उभी आहे. 298 00:16:32,000 --> 00:16:33,542 माफ करा. 299 00:16:33,959 --> 00:16:35,458 -ऍड्रियन. -फ्रँझ. 300 00:16:35,542 --> 00:16:37,583 -फ्रँझ, नमस्कार. -डायेन, आल्याबद्दल धन्यवाद. 301 00:16:37,667 --> 00:16:39,959 -धन्यवाद. -आम्ही सगळेच आहोत इथे. चला सुरू करूया. 302 00:16:40,583 --> 00:16:42,500 -नको, धन्यवाद. -धन्यवाद. 303 00:16:43,542 --> 00:16:44,583 मिस. वुड लुत्झ. 304 00:16:45,125 --> 00:16:47,291 असं दिसतंय जणू काही त्यांचा घटस्फोटच झालाय. 305 00:16:48,583 --> 00:16:51,458 कोल्हे कधीच का भेटत नाहीत हे बघायला मिळणार आपल्याला. 306 00:18:27,959 --> 00:18:30,083 सगळ्यांचे स्वागत असो. आपण सगळे अजुनही सुखरूप आणि 307 00:18:30,166 --> 00:18:32,291 हातीपायी धडधाकट आहोत ह्याबद्दल मला आनंद वाटतो. 308 00:18:32,750 --> 00:18:33,959 सुरुवातीला आम्ही प्रत्येकाला, 309 00:18:34,041 --> 00:18:34,875 गमावलेल्या आपल्या वीरांच्या विधवांकरिता 310 00:18:34,959 --> 00:18:39,083 20,000 डॉलरची मदत करण्याचे आवाहन करतो. 311 00:18:39,166 --> 00:18:44,125 इथे कंजूसपणा करता कामा नये. मला वाटतं आपण सगळेच 40,000 देऊ शकतो. 312 00:18:44,625 --> 00:18:45,834 आपल्यापैकी कुणीही नवीन नाही. 313 00:18:46,834 --> 00:18:49,542 आता, तुमच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार योग्य वाटेल तसा धनादेश तुम्ही फाडू शकता. 314 00:18:49,834 --> 00:18:52,959 दुःखाची गोष्ट ही आहे की, आपल्याला आजकाल स्वतःच आपली काळजी घ्यावी लागतेय. 315 00:18:53,333 --> 00:18:55,834 कसलाही धरबंध नसलेल्या ह्या जगात आपण सगळ्यात तिरस्करणीय ठरलो आहोत. 316 00:18:56,208 --> 00:19:00,083 आणि फार नाटकी आव न आणताही असं म्हणू शकतो की आपण शिकार सुद्धा होत आहोत. 317 00:19:00,166 --> 00:19:01,458 "फार नाटकी आव न आणता." 318 00:19:01,542 --> 00:19:04,000 तुम्हाला काय वाटतं? शिकागोतील तीन वकील प्राणाला मुकले... 319 00:19:04,083 --> 00:19:06,875 -तेही अशिलांकडून. -...आणि अधिकारी विनोद करताहेत. 320 00:19:07,000 --> 00:19:09,291 -कधीकधी ते योग्यही असतात. -नाही. 321 00:19:09,542 --> 00:19:11,750 हा गलका कशाचा आहे? एक मिनिट थांबा. 322 00:19:11,834 --> 00:19:14,583 ठीक. आपल्या अशिलांची यादी पोलिसांना कुणी दिली? 323 00:19:15,917 --> 00:19:18,959 चला, ज्याने केलं असेल त्याने हात वर करा. कुणीच नाही. 324 00:19:19,041 --> 00:19:21,333 हे तर मुद्द्याला सोडून आहे. वकील-अशील संबंधच तर आपल्याला संरक्षक कवच देतात... 325 00:19:21,417 --> 00:19:22,291 हा तर मूर्खपणा आहे. 326 00:19:22,375 --> 00:19:26,041 हवं असेल तर आपण हे सगळं पाच मिनिटात एका न्यायालयीन आदेशानुसार उघडकीस आणू शकतो. 327 00:19:26,125 --> 00:19:28,500 -पण अडचण आहे... थांबा, थांबा. -कारण हे कुणालाच नको आहे. 328 00:19:28,583 --> 00:19:31,667 अडचण ही आहे की अशाने अशील आपल्याला सोडून देतील. 329 00:19:31,750 --> 00:19:34,083 त्यांना जर कळलं की आपण त्यांची नावं पोलिसांना देत आहोत... 330 00:19:34,166 --> 00:19:38,458 -खरंय, निर्दोष असलेले सुद्धा. -नाही, नाही, नाही. अडचण आपण स्वतःच आहोत. 331 00:19:38,542 --> 00:19:42,083 आपल्याला वाटतं आपण एकमेकांवर अतिक्रमण करू. हे अशील सोडून जाण्याबद्दल नाहीच मुळी. 332 00:19:42,166 --> 00:19:44,917 -हे आपल्या चौर्यकर्माबद्दल आहे. -मग ह्यावर काय तोडगा आहे? 333 00:19:45,500 --> 00:19:47,917 पोलिसांनी हे आपल्या गळ्यात मारलंय, असं सांगून की हा आपला प्रश्न आहे. 334 00:19:48,000 --> 00:19:51,250 त्यांना ह्याची जाणीव करून द्यायला पाहिजे की आम्ही काही असेतसे नाही. 335 00:19:51,333 --> 00:19:53,166 आहोत. आपण भरत असलेल्या करांचा आवाका त्यांना दाखवून द्यायला पाहिजे. 336 00:19:53,250 --> 00:19:55,041 रॅमशी बोलायला पाहिजे, त्याच्यावर सोपवलं तर होईल. 337 00:19:55,125 --> 00:19:56,542 त्याला माहितीये त्याचा पैसा कुठून येतोय ते. 338 00:19:56,625 --> 00:19:58,125 -अगदी बरोबर. -रॅम ह्याला हातही लावणार नाही. 339 00:19:59,625 --> 00:20:01,875 कदाचित त्याचा सहायक हे करेल. वॉरन हेसमन. 340 00:20:01,959 --> 00:20:05,834 अगदी बरोबर. वॉरनने ह्याबाबत संकेत पण दिले होते की, 2019 मध्ये तोच हे पहात होता. 341 00:20:06,041 --> 00:20:07,834 त्याला सुनावणीच्या वकिलांचे पैसे हवे होते. 342 00:20:07,917 --> 00:20:09,458 तसेच त्याचे पोलिसांशी पण मित्रत्वाचे संबंध आहेत. 343 00:20:09,542 --> 00:20:10,875 प्रश्नच मिटला. 344 00:20:10,959 --> 00:20:13,208 हे एकदम बरोबर, ऍड्रियन. शाबास. चांगली कल्पना आहे, ऍड्रियन. 345 00:20:14,542 --> 00:20:15,709 पाच मिनिटांत प्रक्षेपण. 346 00:20:16,333 --> 00:20:17,667 पाच मिनिटांत प्रक्षेपण. 347 00:20:18,083 --> 00:20:19,458 "आजचे सर्वेक्षण" 348 00:20:19,542 --> 00:20:22,250 मग... तू परत आलास. 349 00:20:23,208 --> 00:20:24,834 -हो. -उत्तम. 350 00:20:24,959 --> 00:20:28,125 फक्त आपण आपापल्या मर्यादा नको सोडूया इथे, माझ्यावर तुझा प्रकोप नको होऊ देऊस. 351 00:20:28,792 --> 00:20:30,250 अजून एकदा? 352 00:20:31,625 --> 00:20:36,917 मी एक तरुण, आक्रमक आंदोलनकारी आहे. तू वयस्कर ओबामा स्टेटमॅन आहेस. 353 00:20:37,000 --> 00:20:39,709 ह्याच विचाराने त्यांनी ह्या मंडळात दोन कृष्णवर्णीय कायदेपंडित घेतले आहेत. 354 00:20:39,792 --> 00:20:41,458 आपण दोघेही आपापल्या मर्यादा पाळूया. 355 00:20:42,291 --> 00:20:43,208 ठीक? 356 00:20:46,750 --> 00:20:48,333 तुम्ही समितीवर आल्याबद्दल आनंद वाटला, ऍड्रियन. 357 00:20:48,417 --> 00:20:51,500 गेल्या वेळी मजा आली. ती व्हायरल क्लिप छान होती. 358 00:20:52,166 --> 00:20:54,250 -लगे रहो. -धन्यवाद. 359 00:21:04,291 --> 00:21:06,583 नेहेमीप्रमाणे, आमच्याकडे आमची कायदेतज्ञ मंडळींची समिती आहे 360 00:21:06,667 --> 00:21:08,709 जी आपल्याला गेल्या आठवड्यातील कायदा सुव्यवस्थेबद्दल त्यांचे मत देईल. 361 00:21:08,792 --> 00:21:10,083 आणि चौथ्या आठवड्यात सुद्धा ह्या अकस्मिक आणि, 362 00:21:10,166 --> 00:21:12,709 धक्कादायक मृत्युंची मालिका काही थांबलेली नाही 363 00:21:12,792 --> 00:21:15,166 जी अशिलांद्वारे वकिलांची हत्या ह्या तारेवर चालू आहे. 364 00:21:15,250 --> 00:21:18,291 काल रात्री, अजून एक हत्या झाली. ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 365 00:21:18,458 --> 00:21:21,667 एका महिला वकीलाला ती तिच्या कुत्र्याला फिरवत असताना गोळ्या घालून मारलं गेलं. 366 00:21:21,917 --> 00:21:25,959 डोना इव्हान्स, ज्या एका प्रार्थनागृहाचं प्रतिनिधित्व करत होत्या. 367 00:21:26,041 --> 00:21:27,834 पोलिसांना तिच्या प्रियकरावर संशय आहे पण बऱ्याच जणांना असं 368 00:21:27,917 --> 00:21:30,250 वाटतंय की ही सुद्धा अशिलाद्वारे झालेली आणखी एक हत्या आहे. 369 00:21:30,458 --> 00:21:31,500 तुमचं काय म्हणणं आहे, जेदिदाह? 370 00:21:31,583 --> 00:21:33,291 मला वाटतं हा डोनाल्ड ट्रम्पने चालवलेल्या 371 00:21:33,375 --> 00:21:35,333 मुस्लिम विरोधी लाटेचा परिणाम आहे, 372 00:21:35,417 --> 00:21:37,250 ज्यामुळे मुस्लिमांवरील अघोषित बंदी मुख्य प्रवाहात आली... 373 00:21:37,333 --> 00:21:40,750 -सगळं काही वंशवाद नसतो. -जे वंशवादी आहे ते सगळं वंशवाद नाही तर काय. 374 00:21:40,834 --> 00:21:44,500 हे पहा, ही महिला मूलतत्त्ववादी मुस्लिमांसोबत व्यवहार करायची. 375 00:21:44,583 --> 00:21:46,875 ती काय विचार करत होती? तिला काय मरण्याची इच्छा वगैरे होती की काय? 376 00:21:46,959 --> 00:21:48,917 ती एक अतिशय बदनाम मशीद होती, इसिसची नसावी म्हणजे झालं. 377 00:21:49,000 --> 00:21:53,834 हो, पण ही वकील तर रोजच मुस्लिम मूलतत्त्ववादाशी दोन हात करत होती. 378 00:21:53,917 --> 00:21:55,542 तिला हे माहीत असायला हवं होतं की तिला शेवटी काय मिळणार आहे. 379 00:21:55,625 --> 00:21:57,166 तुम्हाला माहिती तरी आहे का तुम्ही कशाबद्दल बोलताहात ते? 380 00:21:57,250 --> 00:21:58,417 बोला, ऍड्रियन. 381 00:21:58,917 --> 00:22:00,041 नाही, ठीक. 382 00:22:00,125 --> 00:22:02,208 नाही, मला वाटतं मला सुद्धा तुमच्या इतकीच माहिती आहे, 383 00:22:02,583 --> 00:22:04,083 आपण मूलतत्त्ववाद्यांना दोष देण्याकरिता फार उतावीळ झालेलो असतो 384 00:22:04,166 --> 00:22:06,375 तेही खुल्या सीमावाद आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात. 385 00:22:06,458 --> 00:22:08,750 पण ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताहात हे खरेखुरे, 386 00:22:08,834 --> 00:22:11,625 लोक आहेत. मी डोना इव्हान्सला ओळखत होतो. 387 00:22:12,125 --> 00:22:14,500 ती अतिशय छान वकील होती. तिने तिच्या लहानश्या आयुष्यात इतक्या चांगल्या 388 00:22:14,583 --> 00:22:16,250 गोष्टी केल्या आहेत जितक्या तुम्ही सगळ्यांनी मिळून सुद्धा केल्या नसतील. 389 00:22:16,333 --> 00:22:19,083 मी काही मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांची पाठराखण नाही करत. 390 00:22:19,166 --> 00:22:22,500 नाही, तुम्ही इथे आहात ज्यासाठी तुम्हाला वार्षिक 170,000 डॉलर मिळताहेत 391 00:22:22,583 --> 00:22:25,500 तेही कशाही प्रकारे अविचाराने तोंड उघडायचे. 392 00:22:29,333 --> 00:22:32,542 तुझी हिंमत कशी झाली! एक वकील म्हणून तू किती कमावतोस? 393 00:22:32,709 --> 00:22:35,208 माझ्यासोबत फार जोर लावू नकोस. 394 00:22:37,041 --> 00:22:41,375 तर, तुम्ही आता माझ्या नोकरीवर आलात तर, हां? आपण बघूच कोण जिंकतं ते. 395 00:22:44,250 --> 00:22:47,625 मला कदाचित केबल न्यूजचा एक नियम सांगायला हवा होता. 396 00:22:47,709 --> 00:22:50,458 पैशाचा उल्लेख कधी म्हणजे कधीही करायचा नाही. 397 00:22:51,375 --> 00:22:54,250 -ठीक. -तुम्हाला भेटून आनंद वाटला. 398 00:23:02,208 --> 00:23:03,750 -ऍड्रियन. -शुभ प्रभात. 399 00:23:09,041 --> 00:23:11,458 -हां, हे मजेशीर होतं. -कोणता भाग? 400 00:23:11,959 --> 00:23:16,250 वार्षिक 170,000 डॉलर. त्याला खरंच इतके मिळतात का? 401 00:23:17,166 --> 00:23:19,417 -माझा तोलच गेला होता, हो ना? -नाही. 402 00:23:19,917 --> 00:23:22,291 तुझा तोल जाताना मी पाहिलाय. हे मुद्दाम केलेलं होतं. 403 00:23:24,125 --> 00:23:26,041 माझा अभिनयाचा सुप्त गुण. 404 00:23:33,375 --> 00:23:37,542 माफ करा. मी हे कधीही केलं नाहीये, पण ते केबल न्यूजवरचे तुम्हीच आहात ना? 405 00:23:37,750 --> 00:23:40,625 काल रात्री माझी सतत तुमच्याविषयी बोलत होती. 406 00:23:40,709 --> 00:23:43,792 तुम्ही तिच्यासाठी तुमची स्वाक्षरी द्याल का? तिचं नाव युनिस आहे. 407 00:23:44,125 --> 00:23:46,333 बचाव पक्षाने तुला नाझी म्हंटलय, डेनिस. 408 00:23:46,417 --> 00:23:48,458 -तू आहेस का? -नाही, मॅम. 409 00:23:48,542 --> 00:23:52,291 तू ओक वुड्सच्या कार्यक्रमाला हजर होतास, 410 00:23:52,375 --> 00:23:55,166 ज्यामध्ये नव-नाझी लोकांची उपस्थिती असल्याचं आढळून आलं आहे. 411 00:23:55,250 --> 00:23:59,291 मी तिथे तुरुंगवास भोगलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांकरिता गेलो होतो. 412 00:23:59,375 --> 00:24:01,750 असं म्हंटलं जातंय की ज्या आंदोलनामध्ये तू गेला होतास 413 00:24:01,834 --> 00:24:04,542 त्यावर बरेच आक्षेप आहेत आणि त्याचा हेतू होता, 414 00:24:04,625 --> 00:24:08,500 कित्येक जातीयवादी आणि वंशवादी गटांना चिथावणे. 415 00:24:08,583 --> 00:24:13,166 माझा हेतू तो नव्हता. मला फक्त आपला इतिहास गमवायचा नव्हता. 416 00:24:13,417 --> 00:24:15,291 तो काही फारच चांगला आहे म्हणून नाही. तसा तो नाही सुद्धा. 417 00:24:17,166 --> 00:24:18,500 मेलेले ते सैनिक 418 00:24:18,917 --> 00:24:23,041 जेस ओवेन आणि हॅराल्ड वॉशिंग्टन ह्यांच्याप्रमाणेच सन्मानाचे दावेदार आहेत. 419 00:24:23,375 --> 00:24:26,458 -आपण त्याचा विचार केला पाहिजे होता. -अच्छा. आणि तू... 420 00:24:26,542 --> 00:24:29,625 -मला वाटतं तू हे मान्य करावंस. -...ते आंदोलन सोडून यायला हवं होतं? 421 00:24:29,709 --> 00:24:31,625 -काय? का? -न्यायमंडळ. 422 00:24:31,875 --> 00:24:36,667 संपूर्ण साक्ष, ते तुला बघताहेत. दूरचित्रवाणी. ते लोकांसोबत असंच करतात. 423 00:24:36,750 --> 00:24:38,917 -धन्यवाद, डेनिस. -परमेश्वरा. 424 00:24:39,000 --> 00:24:42,417 -माझे प्रश्न संपले. -तुम्ही सुरू करा. 425 00:24:43,583 --> 00:24:44,625 मि. हनीकट. 426 00:24:46,125 --> 00:24:49,750 तर, तुम्हाला माहीत होतं की त्या आंदोलनात काही नाझी सुद्धा आलेले आहेत, 427 00:24:49,834 --> 00:24:53,041 पण तुम्ही स्वतः नाझी नाही आहात? 428 00:24:53,500 --> 00:24:54,625 अजिबात नाही. 429 00:24:54,709 --> 00:24:58,792 तुम्ही राष्ट्रपतींनी उल्लेखिलेले सगळ्यात चांगले व्यक्ती आहात का मग? 430 00:24:58,875 --> 00:25:03,166 -उपरोधित्वाबद्दल आक्षेप, महोदय. -हे प्रत्यक्ष विधान आहे, महोदय. 431 00:25:03,250 --> 00:25:04,542 तरी सुद्धा, मान्य आहे. 432 00:25:04,959 --> 00:25:07,834 तुमच्या फेसबुक पेजनुसार, मि. हनीकट, 433 00:25:07,917 --> 00:25:10,625 तुम्ही नागरी युद्धाचे पुरस्कर्ते आहात का? 434 00:25:10,709 --> 00:25:11,792 हो, नक्कीच. 435 00:25:11,875 --> 00:25:14,667 आणि तुम्ही एक पोस्ट टाकली होती, एक अतिशय आक्रमक पोस्ट 436 00:25:14,750 --> 00:25:17,417 जी काही समर्थकांनी घातलेल्या गणवेशाबद्दल होती? 437 00:25:17,500 --> 00:25:21,125 जेव्हा तुम्ही चिकमागाच्या युद्धावर वेलक्रो घालता, 438 00:25:21,208 --> 00:25:23,125 तेव्हा तुम्ही आदर नसल्याचेच दर्शवता. 439 00:25:23,208 --> 00:25:25,000 तुम्ही गणवेशाला फारच गांभीर्याने घेत असल्याने, 440 00:25:25,083 --> 00:25:27,542 तुम्ही गेला होता त्या आंदोलनामध्ये तुम्ही 441 00:25:27,625 --> 00:25:29,625 घातलेल्या गणवेशाबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? 442 00:25:29,709 --> 00:25:32,000 मी कुठलाही गणवेश घातला नव्हता. 443 00:25:32,625 --> 00:25:36,709 पांढरा सदरा आणि खाकी पँट, जो बाकीच्या सगळ्या लोकांसारखाच आहे. 444 00:25:36,792 --> 00:25:39,208 आक्षेप. हे तर मॉलमधले विक्रेते पण करतात. 445 00:25:39,583 --> 00:25:41,166 -हा वाद झाला. -मी हा मान्य करतो. 446 00:25:41,250 --> 00:25:44,667 माइटी हॅमर नावाच्या संकेतस्थळाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? 447 00:25:45,333 --> 00:25:46,750 मी ऐकलंय त्याबद्दल. 448 00:25:46,834 --> 00:25:51,375 तुम्ही त्याबद्दल ऐकलंय तर. "तुमचे तपकिरी शर्ट आणि स्वस्तिकाचे बंद बाजूला ठेवा. 449 00:25:51,458 --> 00:25:57,291 आजच्या वेरमॅटला हवं आहे की शासनाने आपल्याला वेगळं बाजूला काढू नये. 450 00:25:57,667 --> 00:26:03,542 फक्त खाकी पँट आणि वेलक्रो शर्ट." 451 00:26:03,625 --> 00:26:06,125 जेव्हा मी तो पोषाख परिधान केला, मी असा कुठलाही विचार केलेला नव्हता. 452 00:26:06,208 --> 00:26:09,917 तसेच, मी हातावर कसलाही स्वस्तिक बंध पण बांधलेला नव्हता, 453 00:26:10,000 --> 00:26:12,959 आणि असं करणाऱ्या लोकांसोबत मी फारसा मिसळत पण नाही. 454 00:26:13,041 --> 00:26:14,583 किंवा इतर ठिकाणी त्यांच्यात मिसळणाऱ्या लोकांशी पण संपर्क ठेवत नाही. 455 00:26:15,458 --> 00:26:17,917 -महोदय. -मि. बोसमन, 456 00:26:18,000 --> 00:26:21,041 -कृपया तुमची उपरोधिक टिपणी पुन्हा काढा. -निश्चित, महोदय. 457 00:26:22,041 --> 00:26:26,125 मि. हनीकट, मी जर तुमच्या वक्तव्याचा विपर्यास करत असेन तर मला क्षमा करा. 458 00:26:26,792 --> 00:26:30,166 कारण आम्हाला तुम्ही लिहीलेलं काहीतरी मिळालंय 459 00:26:31,458 --> 00:26:35,291 काही लिखाण, तुमच्या 2012 च्या पोस्टमधलं, 460 00:26:35,542 --> 00:26:37,375 जे तुम्ही नंतर डिलीट पण केलं. 461 00:26:37,458 --> 00:26:38,625 महोदय, त्यातील काही मला आत्ता वाचायची परवानगी असावी. 462 00:26:38,709 --> 00:26:39,917 आक्षेप आहे, महोदय. 463 00:26:40,000 --> 00:26:42,208 पूर्वग्रहदूषित. हे सहा वर्षांपुर्वीचं आहे. 464 00:26:42,291 --> 00:26:44,000 महोदय, साक्षीदार नाकारण्यास मुखत्यार आहे. 465 00:26:44,083 --> 00:26:45,125 अमान्य. 466 00:26:45,208 --> 00:26:49,500 "आपण हॅकनक्रुझ घालून स्वतःला खूप सहजपणे निशाण्यावरून बाजूला करू शकतो." 467 00:26:49,583 --> 00:26:51,959 हे तर क्लॅनचं श्वेतधार्जिणेपणाचंच झालं. 468 00:26:52,041 --> 00:26:56,208 "आता आपण सत्ताधाऱ्यांना आपला विसर पडेल असं केलं पाहिजे. 469 00:26:57,333 --> 00:26:59,041 ज्यू तर पैसे कमावण्यात व्यस्त आहेत, 470 00:26:59,500 --> 00:27:02,542 समलैंगिक संस्कृती भ्रष्ट करण्यात गुंग झालेले आहेत, 471 00:27:02,625 --> 00:27:08,583 आणि इथिओपी लोक आपण कशाचे प्रतिनिधित्व करतो हे कळण्याइतके हुशार नाहीत." 472 00:27:08,667 --> 00:27:10,917 -माझा ह्यावर अजिबात विश्वास नाही. -पण तेव्हा होता का? 473 00:27:11,000 --> 00:27:13,166 नाही, मी फक्त इतर लोक काय म्हणतात ते मांडत होतो. 474 00:27:13,250 --> 00:27:15,875 ती फक्त एक पोस्ट होती. ती फक्त एक ठिणगी होती. 475 00:27:15,959 --> 00:27:18,917 ठिणगी? ज्यूसारख्या लोकांना चेतवणारी ठिणगी? 476 00:27:19,000 --> 00:27:21,792 कृष्णवर्णीय आणि समलैंगिक यांसारख्या लोकांना चेतवणारी ठिणगी? 477 00:27:21,875 --> 00:27:25,000 नाही! मी कधीच... मला असं कधीच म्हणायचं नव्हतं! माझा ह्यावर कधीच विश्वास नव्हता! 478 00:27:25,083 --> 00:27:28,417 मला एक छोटीशी विश्रांती हवी आहे, महोदय. 479 00:27:28,500 --> 00:27:32,458 ठीक. कदाचित साक्षीदाराला काहीतरी नवा फाटा फोडायला वेळ हवा असेल. 480 00:27:40,083 --> 00:27:43,709 ते येतीलच एका मिनिटात. तू ठीक आहेस ना? 481 00:27:44,959 --> 00:27:46,917 हो. का? 482 00:27:47,583 --> 00:27:49,542 काही कारण नाही. फक्त विचारतेय. 483 00:27:52,834 --> 00:27:55,333 -मी गर्भवती आहे. -अभिनंदन. 484 00:27:57,000 --> 00:27:58,250 मी आता सगळ्यांना सांगतेय. 485 00:27:58,333 --> 00:27:59,709 अच्छा. आता मी तुझं ओटीभरण करणार आहे. 486 00:27:59,792 --> 00:28:02,125 नाही, प्लीज. नको. 487 00:28:02,208 --> 00:28:06,041 -खूप उशीर झालाय. -नाही, खरंच, मला अजिबात आवडत नाहीत. 488 00:28:06,333 --> 00:28:10,333 अच्छा, हे एकदम नवीन, वेगळ्याच पद्धतीचं आहे ना. 489 00:28:11,375 --> 00:28:14,041 -लुका, तुला ताटकळत ठेवल्याबद्दल क्षमा कर. -ये आत. 490 00:28:18,375 --> 00:28:19,583 बोलण्याकरिता वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 491 00:28:20,291 --> 00:28:24,166 मला माझ्या भागीदारांना माझ्या गर्भारपणाबद्दल औपचारिकपणे सांगायचं होतं. 492 00:28:25,542 --> 00:28:28,000 तुम्हाला असं वाटत असेल की मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं का नाही. 493 00:28:28,083 --> 00:28:30,500 मी आकस्मिक गडबडींसाठी स्वतःला तयार करत होते. 494 00:28:30,583 --> 00:28:33,417 -आम्ही मध्ये बोलू का काही? -हो, नक्की. 495 00:28:33,500 --> 00:28:36,500 -अभिनंदन! -अभिनंदन! तू खूप छान दिसते आहेस! 496 00:28:39,500 --> 00:28:40,417 धन्यवाद. 497 00:28:42,583 --> 00:28:45,291 बाळंतपणाची तारीख 22 मे दिलीयं. 498 00:28:45,542 --> 00:28:49,500 मी 25 मे रोजी पुन्हा माझ्या कामावर हजर राहणार आहे, फक्त तीन दिवस सुटी घेईन, 499 00:28:49,583 --> 00:28:50,917 ज्यामध्ये कोर्टाचं कसलंही कामकाज चालू नाही. 500 00:28:51,500 --> 00:28:54,166 सगळ्या वैद्यकीय चाचण्या सकाळी 9 च्या आत असतील 501 00:28:54,250 --> 00:28:56,250 बाळाची काळजी घेण्यासाठीची सगळी व्यवस्था केलीयं. 502 00:28:56,333 --> 00:29:00,125 मला कसलाही वेगळा भत्ता नको आहे, तसेच मला कशाची गरज देखील नाही. 503 00:29:00,208 --> 00:29:04,875 मी माझं पूर्ण काम मी कसल्याही अडथळ्याशिवाय करू शकते. 504 00:29:05,208 --> 00:29:10,417 आणि मी मार्कोनी दुहेरी हत्याकांड प्रकरणात मी आघाडी सांभाळायला खूप उत्सुक आहे, 505 00:29:10,875 --> 00:29:12,875 कारण गेल्या वर्षभरापासून मी त्यावर काम करतेय. 506 00:29:14,125 --> 00:29:16,709 अच्छा, एका सहा वर्षाच्या बाळाचा वडील ह्या नात्याने, 507 00:29:17,208 --> 00:29:21,875 मला ह्या जबाबदारीची व्याप्ती सांगू इच्छितो. 508 00:29:22,375 --> 00:29:25,375 -ठीक आहे. -आणि मला हे सुद्धा सांगायचं आहे की, 509 00:29:25,458 --> 00:29:28,250 कायद्यानुसार आम्ही सगळे तुझ्या नियोजनामागे खंबीरपणे उभे आहोत. 510 00:29:28,917 --> 00:29:30,250 तेव्हा निश्चिंतपणे काम कर. 511 00:29:34,875 --> 00:29:35,709 कसं काय राहिलं? 512 00:29:38,959 --> 00:29:40,166 मग, काय वाटतंय? 513 00:29:41,083 --> 00:29:43,667 मला नाही वाटत आपण कायद्याने ह्यावर काही विचार. 514 00:29:43,750 --> 00:29:45,083 करू शकतो. आपल्याला फक्त प्रतिक्रिया देता येईल. 515 00:29:46,208 --> 00:29:49,750 मग, आपण ती न्यायालयात काय करते ह्यावर ठरवूया. 516 00:29:49,834 --> 00:29:53,000 हो आणि मायाला ह्यासाठी तयार ठेवा. 517 00:29:56,083 --> 00:29:58,959 वॉरेन हेसमन, सहायक नगराध्यक्ष ह्यांचे स्वागत असो. 518 00:29:59,041 --> 00:30:01,417 मी नमूद करू इच्छितो की मी सुनावणी करणाऱ्या वकिलाचा खूप चांगला मित्र आहे. 519 00:30:01,583 --> 00:30:04,208 कधी नव्हे ती आपल्याला त्यांची गरज आहे. ते आपले मार्गदर्शक आहेत. 520 00:30:04,291 --> 00:30:06,917 त्यानंतर आम्हाला तुम्ही आमच्यासाठी पोलिसांकडे बोलावं असं वाटतं. 521 00:30:07,000 --> 00:30:09,250 ते ह्या हत्यांची प्रकरणं गांभीर्याने घेतच नाहीत. 522 00:30:09,333 --> 00:30:11,667 बाहेरून जरी हे असं दिसत असलं, तरी खरं ते तसं नाही. 523 00:30:11,750 --> 00:30:15,583 -मला अमान्य आहे. -विल्क हॉबसनने आत्महत्या केलेली नाही. 524 00:30:15,667 --> 00:30:17,959 मी त्याला ओळखतो. त्याला धमक्यांचे फोन येत होते. 525 00:30:18,041 --> 00:30:20,834 -मग पोलीस आवश्यक तो तपास करतील. -त्यांनी करायचा तपास केलाय. 526 00:30:20,917 --> 00:30:23,417 -त्यांनी त्याला आत्महत्या घोषित केलंय. -ते अनौपचारिक मत होतं. 527 00:30:23,500 --> 00:30:27,500 हे पहा, वॉरेन, आम्हाला अजिबात वाटत नाही की पोलीस ही प्रकरणं गांभीर्याने घेते आहे. 528 00:30:27,583 --> 00:30:29,333 आम्ही काय करायला पाहिजे? 529 00:30:29,417 --> 00:30:31,041 मी तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. 530 00:30:32,083 --> 00:30:34,750 पण... पण मला तुमची मदत हवी आहे. 531 00:30:35,667 --> 00:30:37,125 आता आम्हाला ही कळकळीची विनंती मिळाली आहे. 532 00:30:37,458 --> 00:30:41,917 नाही. पोलीस, चूक असो वा बरोबर, तुमच्याकडे शत्रुत्वाच्या नात्याने पाहतात 533 00:30:42,000 --> 00:30:44,667 कारण खरं सांगायचं झालं तर कधीकधी तुम्ही तसे असता. 534 00:30:44,750 --> 00:30:46,959 -आम्ही शत्रू कसे? -तुम्ही त्यांना न्यायालयात खेचता. 535 00:30:47,917 --> 00:30:50,500 आम्ही नक्कीच त्यांना न्यायालयात खेचतो. त्यामुळे ते प्रामाणिक राहतात. 536 00:30:50,583 --> 00:30:53,000 काही संस्था तर पोलिसांना न्यायालयात खेचणं हेच त्यांच ध्येय ठरवल्यासारखं काम करतात. 537 00:30:53,083 --> 00:30:54,500 गोलमोल बोलणं थांबवा आता. 538 00:30:54,583 --> 00:30:56,166 ह्या टेबलावर फक्त एकच संस्था आहे जी पोलिसांवर 539 00:30:56,250 --> 00:30:57,959 दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी 60 टक्के 540 00:30:58,041 --> 00:30:59,000 प्रकरणांकरिता जबाबदार आहे. 541 00:30:59,083 --> 00:31:01,000 आणि त्यातील प्रत्येक प्रकरण यशस्वीरित्या तडीस गेलं आहे. 542 00:31:01,083 --> 00:31:03,333 कुणीच ते अमान्य करत नाहीये पण त्याने जी चिथावणी मिळते 543 00:31:03,417 --> 00:31:05,083 त्यामुळे पोलीस तुमच्या विरोधात गेले आहेत. 544 00:31:05,166 --> 00:31:07,166 म्हणजे गुन्हेगारच अडचण ठरताहेत तर? 545 00:31:07,250 --> 00:31:09,250 पोलीस जेव्हा चुकतात तेव्हा त्यांना न्यायालयात खेचलं जाऊ शकतं, 546 00:31:09,333 --> 00:31:12,709 पण कधी कधी त्यांचं काहीही चुकलेल नसताना त्यांना हे सगळं झेलावं लागलं. 547 00:31:12,792 --> 00:31:14,959 त्यामुळे पोलिसांशी ह्या प्रकरणी बोलणं थोडं अवघड होऊन बसलं आहे. 548 00:31:15,041 --> 00:31:16,709 आम्हाला पोलिसांशी कसलीही मैत्री नकोच आहे. 549 00:31:16,792 --> 00:31:19,083 आम्हाला फक्त त्यांनी त्यांच काम नीट करायला हवं आहे. 550 00:31:19,166 --> 00:31:21,250 अच्छा, हे इथेच सोडूया, वॉरेन. 551 00:31:21,333 --> 00:31:23,959 तुम्ही आमच्यासाठी जे काही करू शकत असाल, ते तुम्ही करावं अशी आमची विनंती आहे, 552 00:31:24,041 --> 00:31:26,333 आणि आम्हीही पाहू की आम्हाला तुमच्यासाठी काय करता येईल. 553 00:31:26,709 --> 00:31:30,333 ह्याचा आपल्या पोलिस अत्याचार प्रकरणांशी काहीही संबंध नाही! 554 00:31:30,417 --> 00:31:33,041 -आणि हे आपण त्यांना आधीच सांगितलं होतं. -मग ते इथे कशाला उकरून काढलं? का? 555 00:31:33,125 --> 00:31:35,583 आपल्याबद्दल इतरांचे काय समज आहेत हे सांगतोय फक्त, ज्युलियस. 556 00:31:35,667 --> 00:31:39,125 मग, काय, पोलिस फक्त त्यांच काम करतील 557 00:31:39,208 --> 00:31:42,250 आपण त्यांच्या विरोधातील अत्याचारांची प्रकरणं माघारी घेऊ? 558 00:31:42,333 --> 00:31:45,125 वॉरेन हेसमनचं म्हणणं असं होतं की आपण जरा सौम्यपणे 559 00:31:45,208 --> 00:31:46,875 घ्यायला पाहिजे. मी म्हणत नाही की आपण घेणार आहोत. 560 00:31:46,959 --> 00:31:50,000 तू आम्हाला त्याबद्दलच तर सांगतो आहेस. मग त्यात शांत बसण्यासारखं कसं काही असेल? 561 00:31:50,083 --> 00:31:51,750 मग तुला काही न सांगणं बरं राहिलं असतं का? 562 00:31:51,834 --> 00:31:54,709 नाही, आपण ती सहा धेंडांची बैठक सोडून बाहेर पडणं बरं झालं असतं. 563 00:31:54,792 --> 00:31:56,792 आपल्याला आमंत्रण दिलं गेलंय जेणेकरून आपल्यावर दबाव निर्माण केला जावा 564 00:31:56,875 --> 00:31:58,375 आणि त्यातून आपण पोलिसांविरुद्ध असलेले आपले दावे काढून घ्यावे. 565 00:31:58,458 --> 00:32:00,625 मला मान्य नाही. आपल्याला त्यांच्या शेजारी जागा मिळालीयं. 566 00:32:00,709 --> 00:32:02,500 आपण सर्वोच्च सहा संस्थांच्या बरोबरीला आलो आहोत. 567 00:32:03,375 --> 00:32:05,583 हे जगभरातल्या सगळ्या वैतागाचं मोल असल्यासारखं आहे! 568 00:32:05,667 --> 00:32:06,875 ते जर आपल्याला असं काहीतरी करायला सांगत असतील जे 569 00:32:06,959 --> 00:32:11,083 आपल्याला करायचं नाही, तर आपण फक्त नाही म्हणावं. 570 00:32:11,291 --> 00:32:14,125 हे तू बोलतो आहेस की कायदेपंडित? 571 00:32:19,750 --> 00:32:23,875 बचावपक्ष डॉ. विल्यम ब्रेन्टवुडची साक्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे, महोदय. 572 00:32:24,834 --> 00:32:28,125 तेव्हा, ही नक्की 234 क्रमांकाची पूर्व-सुनावणी आहे का? 573 00:32:28,208 --> 00:32:29,083 "मा. क्लाउदिया फ्रेन्ड" 574 00:32:29,166 --> 00:32:30,959 किंवा 235? 575 00:32:31,041 --> 00:32:33,500 हो, ही नक्कीच तशी वाटतेयं, हो ना महोदया? 576 00:32:33,583 --> 00:32:36,208 हो, मी विरघळले नाही, वकील महाशय. 577 00:32:36,291 --> 00:32:39,625 आतापर्यंत इतक्याच सुनावण्या झालेल्या आहेत. 578 00:32:39,709 --> 00:32:42,291 तेव्हा, हे डॉ. ब्रेन्टवुड काण आहेत? 579 00:32:42,458 --> 00:32:43,291 एक तज्ञ साक्षीदार ज्यांना पक्षकार 580 00:32:43,375 --> 00:32:44,375 घटनास्थळी सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांबद्दल 581 00:32:44,458 --> 00:32:45,959 बोलण्यासाठी आमंत्रित करत आहेत. 582 00:32:46,041 --> 00:32:48,709 -जर तुमची परवानगी असेल तर, महोदया... -मी माझं बोलणं अजून संपवलेलं नाही. 583 00:32:48,792 --> 00:32:52,333 आणि आम्ही पुन्हा सांगतो की पक्षकारांनी त्यांचे निष्कर्ष आमच्याही निदर्शनास आणावे. 584 00:32:52,417 --> 00:32:54,667 हे ब्रॅडी उल्लंघनाच्या खूप जवळ पोहोचलं आहे. 585 00:32:54,750 --> 00:32:56,500 मला एक सुनावणी आहे जी जास्त महत्त्वाची आहे. 586 00:32:56,583 --> 00:32:59,375 -प्रक्रियात्मक, साक्षीसंबंधी नव्हे. -तुम्ही हे आधीच सांगायला हवं होतं. 587 00:32:59,458 --> 00:33:01,959 तुम्ही खूपच पटकन सुरू केलंत त्यामुळे मला संधीच मिळाली नाही. 588 00:33:02,041 --> 00:33:07,458 हे, ईश्वरा, तुम्ही दोघं म्हणजे फारच आहात. पुढचं म्हणणं काय आहे, मि. मोरेलो? 589 00:33:07,542 --> 00:33:09,625 -पुढची तारीख, महोदया. -आणखी एक? 590 00:33:10,542 --> 00:33:12,792 फिर्यादी पक्षाने 21 मे ह्या आठवड्याच्या 591 00:33:12,875 --> 00:33:15,667 सुरुवातीला ही सुनावणी ठेवण्याची विनंती केली आहे. 592 00:33:16,959 --> 00:33:21,083 महोदया, हा विचित्रपणा आहे. फिर्यादी पक्ष चार महिन्यांचा कालावधी मागत आहेत. 593 00:33:21,166 --> 00:33:23,667 "विचित्र" फारच तीव्र झालं. इतक्या गुंतागुंतीच्या 594 00:33:23,750 --> 00:33:25,291 प्रकरणांमध्ये काही आठवड्यांचा अवधी ही सामान्य बाब आहे. 595 00:33:25,375 --> 00:33:29,750 अशाने आमच्या अशिलाचा वेगाने सुनावणी होण्याचा अधिकार नाकारला जातो आहे. 596 00:33:30,083 --> 00:33:31,250 काही महिन्यांचा उशीर हा वेगाने होणाऱ्या सुनावणीचा 597 00:33:31,333 --> 00:33:32,875 अधिकार नाकारला जाण्यासारखी बाब नाही, महोदया. 598 00:33:32,959 --> 00:33:36,333 अच्छा. हे तर मजेशीरच होतं. मला तुम्ही दोघांनी 599 00:33:36,417 --> 00:33:37,583 सभागृहाच्या बाहेर एकत्र जायला हवं आहे, 600 00:33:37,667 --> 00:33:40,375 आपापली वेळापत्रकं काढा आणि एक तारीख ठरवा. 601 00:33:40,500 --> 00:33:43,959 एका तासाभरात इथे या आणि मग मी तुमचा प्रस्ताव ऐकेन. 602 00:33:47,792 --> 00:33:49,917 तू माझ्या परिस्थितीचा फायदा घेऊ बघतो आहेस. 603 00:33:50,000 --> 00:33:53,041 मी कशाचाही फायदा घेत नाहीये. मी एका प्रकरणाची कार्यवाही करतो आहे. 604 00:33:55,709 --> 00:33:57,000 पुढची तारीख घे. 605 00:34:00,375 --> 00:34:03,500 तू बाळाचा जन्म ज्या आठवड्यात होणार आहे त्याच आठवड्याची तारीख मागितलीस, 606 00:34:03,583 --> 00:34:05,083 आणि हे फायदा घेणं नाही? 607 00:34:05,166 --> 00:34:07,667 मी सुनावणीसाठी सोयीच्या तारखा निवडल्या आहेत, 608 00:34:07,750 --> 00:34:09,834 ज्याचा तुझ्या गर्भारपणाशी काही संबंध नाही, 609 00:34:09,917 --> 00:34:11,458 कारण तुला आम्ही तुझ्याशी तसंच वागायला हवं आहे. 610 00:34:11,542 --> 00:34:15,834 हे, ईश्वरा, आता मला कळालं. तुला मायाच्या विरुद्ध प्रकरण हवं आहे. 611 00:34:15,917 --> 00:34:17,125 काय? 612 00:34:17,208 --> 00:34:20,125 तुला माहितीयं ती अनुभवी नाही. हे सगळं असं आहे तर. 613 00:34:20,208 --> 00:34:23,667 तू हे मनाचे मांडे भाजणं बंद करशील का? इतकं बेकायदेशीर कुणी वागत नाही इथे. 614 00:34:34,458 --> 00:34:37,125 हाय. मी इथे बसले तर काही हरकत नाही ना? मला लगेच कामाला पळायचं आहे. 615 00:34:37,208 --> 00:34:39,917 नाही, बस की. मी सुद्धा घाईतच आहे. 616 00:34:40,000 --> 00:34:41,750 हे ईश्वरा, मला ह्या कायद्याच्या संस्थांमध्ये कामच करायला आवडत नाही. 617 00:34:42,000 --> 00:34:42,834 मला सांग ना त्याबद्दल. 618 00:34:43,083 --> 00:34:45,792 -कुठे काम करतेस तू? -मेंडेलसन, ग्रँट अँड असोसिएट्स. 619 00:34:45,875 --> 00:34:48,959 अरे, हो, मी ऐकलंय की ते खूप अवघड आहे. कोण वकील आहे? 620 00:34:49,041 --> 00:34:50,041 फ्रँझ मेंडेलसन. 621 00:34:50,125 --> 00:34:53,000 वा, सगळ्यात मोठा वकील. खूप अशील असतील मग. 622 00:34:54,458 --> 00:34:56,583 तुम्ही तर नवीन कुणाचं तरी वकीलपत्र पण स्वीकारलंय ना? 623 00:34:56,667 --> 00:34:57,875 म्हणजे काय? 624 00:34:57,959 --> 00:35:03,875 कुणीतरी... मी कागदपत्रं पाहिली. हे शिकागो पो वि का कुणीतरी होतं का? 625 00:35:04,333 --> 00:35:09,250 हो, त्यांचे दिवाणी दावे. अजून आलं नाही ते आमच्याकडे, पण आमचे प्रयत्न चालू आहेत. 626 00:35:09,333 --> 00:35:11,834 -हां, ते तर असणारच. -तू कोणत्या संस्थेमध्ये आहेस? 627 00:35:12,875 --> 00:35:15,417 पिनव्हील, विंक्लर अँड असोसिएट्स. 628 00:35:16,417 --> 00:35:18,500 पिनव्हील, विंक्लर... मला तर हे नाव ऐकल्याचं पण आठवत नाही. 629 00:35:18,917 --> 00:35:20,125 आम्ही अशातच सुरू केलंय काम. 630 00:35:22,709 --> 00:35:23,917 चल मी जाते. 631 00:35:24,000 --> 00:35:26,333 -शिकागो पीडी साठी शुभेच्छा. -धन्यवाद. 632 00:35:31,542 --> 00:35:33,959 डायेन, फ्रँझ मेंडेलसनची एक बातमी आहे जी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. 633 00:35:35,208 --> 00:35:39,166 खरंच? फारच छान, मारिसा. मस्त काम केलंस. 634 00:35:39,959 --> 00:35:41,250 ठीक, तुझ्याशी नंतर बोलते. 635 00:35:45,291 --> 00:35:48,250 महोदय! बचाव पक्ष नजर फिरवतो आहे! 636 00:35:48,333 --> 00:35:52,458 नकळत झालं, महोदय. कधी कधी माझे डोळे स्वतःच काहीतरी करून बसतात. 637 00:35:53,709 --> 00:35:57,500 मि. बोसमन, सगळ्या दर्शनी समालोचनाला बाजूला ठेवा. 638 00:35:57,583 --> 00:35:58,625 नक्कीच, महोदय. 639 00:35:59,000 --> 00:36:04,041 मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, मि. कुझ्मा. फिर्यादीचा कल सांभाळणारा आणखी एक. 640 00:36:04,834 --> 00:36:07,709 तुम्ही फिर्यादीचे नाव आणि पत्ता का छापला? 641 00:36:07,792 --> 00:36:10,375 कारण मला नाझींचा खूप राग येतो. आणि हे नाझी रस्त्यातून 642 00:36:10,458 --> 00:36:11,792 मोर्चा वगैरे काढू लागले की माझं टाळकंच फिरतं. 643 00:36:12,166 --> 00:36:18,125 मी हेतुपुरस्सर भावनिक ताण दर्शवतो आहे का? मला वाटतं हो. 644 00:36:19,000 --> 00:36:22,667 मि. कुझ्मा, तुम्हाला डेनिस हनीकट यांचा पत्ता कुठे सापडला? 645 00:36:23,000 --> 00:36:24,667 अच्छा, तो फोनबुकमध्ये आहे. 646 00:36:25,291 --> 00:36:28,750 -फोनबुकमध्ये आहे? -हो. 647 00:36:29,000 --> 00:36:34,750 हे तर त्या आर्सोनिस्ट लोकांसारखंच झालं ना ज्यांचे पत्ते फोनबुकमध्ये सापडायचे? 648 00:36:34,834 --> 00:36:37,166 आक्षेप. असंबद्ध. 649 00:36:37,250 --> 00:36:39,667 मला समजू शकतं तुम्हाला तो प्रश्न का नको आहे ते. 650 00:36:40,417 --> 00:36:41,959 मला माझ्या सभागृहातील सगळेच वकील खोलीत हवे आहेत. 651 00:36:42,917 --> 00:36:45,125 -का, महोदय? -कारण मी म्हणतो म्हणून! 652 00:36:48,000 --> 00:36:49,625 भपकेबाजपणा खूप झाला, मि. बोसमन. 653 00:36:50,625 --> 00:36:52,917 -माफ करा? -माझ्यासोबत ही नाटकं करू नका. 654 00:36:53,000 --> 00:36:56,333 -तुम्ही न्यायमंडळाला उद्युक्त करत आहात. -महोदय, मी तर फक्त... 655 00:36:58,709 --> 00:37:02,291 हो, खरं तर, मी करतोय. मी आपल्या प्रकरणात न्यायमंडळाकडे दाद मागतोय. 656 00:37:02,834 --> 00:37:04,834 -तेच माझं काम आहे. -तुमचा आवाज नीट बघून घ्या, महाशय. 657 00:37:04,917 --> 00:37:07,375 ते इथे कायदेपंडीत म्हणूनच वावरताहेत, महोदय. 658 00:37:07,458 --> 00:37:09,625 -नाही, मी फक्त एक वकील म्हणूनच वागतो आहे. -ते दिसतंच आहे. 659 00:37:09,792 --> 00:37:12,667 आणि मी माझ्या सदनात ते अजिबात खपवून घेणार नाही. 660 00:37:12,750 --> 00:37:14,834 मि. बोसमन, तुम्ही किती वेळा दूरचित्रवाणीवर झळकला 661 00:37:14,917 --> 00:37:16,500 आहात ह्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. 662 00:37:16,583 --> 00:37:19,709 ते सगळं माझ्या सदनाच्या बाहेरच सोडायचं. 663 00:37:20,625 --> 00:37:24,250 महोदय, कृपया तुम्ही सांगू शकाल का मि. बोसमन यांनी वेगळं काय करायला हवं आहे? 664 00:37:24,333 --> 00:37:27,000 -माफ करा? -ते जे काही करत आहेत 665 00:37:27,542 --> 00:37:28,667 त्यापेक्षा त्यांनी वेगळं काय करायला हवं आहे? 666 00:37:28,750 --> 00:37:30,542 त्यांनी न्यायमंडळाला उद्युक्त करणं थांबवायला हवं आहे. 667 00:37:30,625 --> 00:37:33,417 -त्यांनी न्यायमंडळाकडे पाहणं टाळायचं का? -मी ते म्हणत नाही. 668 00:37:33,500 --> 00:37:34,667 त्यांनी खुर्चीतच बसून रहायचं का? 669 00:37:35,125 --> 00:37:36,583 नाही. त्यांना माहितीये ते काय करताहेत ते. 670 00:37:36,667 --> 00:37:38,583 महोदय, मि. बोसमन जे काही करताहेत... 671 00:37:39,458 --> 00:37:41,250 ते म्हणजे त्यांच्या अशिलासाठी जास्तीत जास्त 672 00:37:41,625 --> 00:37:43,000 परिणामकारक वकील होण्याचा प्रयत्न आहे. 673 00:37:43,375 --> 00:37:46,709 तुम्ही त्यांना नेमकं वेगळं काय करायचं हे न 674 00:37:46,792 --> 00:37:47,917 सांगता त्यांची वर्तणूक बदलण्यास सांगत आहात. 675 00:37:48,000 --> 00:37:50,959 -त्यामुळे माझा आक्षेप आहे. -कशाबद्दल? 676 00:37:52,625 --> 00:37:56,709 तुमच्या मि. बोसमन यांनी आमच्या अशिलांसाठी 677 00:37:56,792 --> 00:37:58,667 परिणामकारक वकिली करणं थांबवावं ह्या आदेशावर. 678 00:37:59,458 --> 00:38:01,875 माझ्या आदेशाचा अर्थ तो नाही. 679 00:38:01,959 --> 00:38:03,792 मग, ह्याचा अर्थ तुम्ही आमचा आक्षेप मान्य करता तर? 680 00:38:03,875 --> 00:38:04,709 नाही. 681 00:38:04,792 --> 00:38:05,792 मग मला आक्षेप अमान्य असल्याचे सांगा, महोदय. 682 00:38:06,834 --> 00:38:08,208 एका आदरणीय वकील महाशयांनी सांगितल्याप्रमाणे, "मला, 683 00:38:08,291 --> 00:38:10,333 अमान्य ऐकायला आवडतं जेणेकरून मी पुढे दाद मागू शकेन." 684 00:38:11,125 --> 00:38:14,000 मग, ह्यावर प्रयत्न करून पहा. अमान्य. 685 00:38:14,500 --> 00:38:17,709 -धन्यवाद, महोदय. -हे प्रकरण तुम्हा दोघांच्या हातातलं आहे. 686 00:38:18,333 --> 00:38:20,667 मला कळत नाही की तुम्ही ते सगळं का करताहात ज्यामुळे तुम्ही ही केस हरू शकता. 687 00:38:20,750 --> 00:38:22,667 कारण तुम्ही आमचा एक हात आम्हाला मागे बांधून लढायला, 688 00:38:22,750 --> 00:38:24,291 सांगत आहात आणि न्यायमंडळाला हे स्पष्टपणे दिसतंय. 689 00:38:24,709 --> 00:38:27,333 -अजून काही आहे का, महोदय? -हो. चालते व्हा. 690 00:38:27,709 --> 00:38:28,709 धन्यवाद. 691 00:38:34,417 --> 00:38:36,166 मला वाटत होतं की मीच गोंधळ घालतोय. 692 00:38:37,250 --> 00:38:39,250 मारिसाने जे आणलंय ते ऐकेपर्यंत थांब. 693 00:38:40,417 --> 00:38:42,667 -काय हाती लागलं? -तुमचे नवीन मित्र, मेंडेलसन? 694 00:38:42,750 --> 00:38:43,834 ते तुम्हाला खेळवताहेत. 695 00:38:47,583 --> 00:38:50,083 आपल्याकडे पोलीस तपासाबद्दल काहीही नवीन बातमी नाही, 696 00:38:50,166 --> 00:38:54,875 पण मि. हेसमनसोबत झालेली बैठक आणि त्यातील घडामोडींबद्दल मी थोडी चर्चा करू इच्छितो. 697 00:38:54,959 --> 00:38:57,000 त्यात चर्चा करण्यासारखं काय आहे? त्यांनी सगळं काही आपल्यावरच टाकलंय. 698 00:38:57,083 --> 00:39:00,709 मला नाही वाटत हे खरं असेल. खरं तर त्यांच्याकडे एक अतिशय चांगला सल्ला होता. 699 00:39:00,792 --> 00:39:01,625 कोणता? 700 00:39:01,709 --> 00:39:04,667 आपण पोलीस खात्याविरुद्ध अत्याचाराची जी प्रकरणं चालवतो आहोत 701 00:39:04,750 --> 00:39:07,875 ती आपल्या विरुद्ध जाताहेत. 702 00:39:07,959 --> 00:39:09,709 ती प्रकरणं किती आहेत ह्याचा फारसा संबंध नाही, 703 00:39:09,792 --> 00:39:14,208 पण त्याची व्याप्ती, त्यांची तीव्रता मात्र बघायला पाहिजे. 704 00:39:14,291 --> 00:39:15,917 आम्ही नाही. आमच्याकडे अशी प्रकरणंच नाहीत. 705 00:39:16,000 --> 00:39:19,166 ऍड्रियन... तुम्ही काही करू शकता का? 706 00:39:20,291 --> 00:39:21,166 नाही. 707 00:39:21,250 --> 00:39:23,792 आम्ही इथे एकत्र काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत तेही एक समूह होऊन, ऍड्रियन. 708 00:39:24,083 --> 00:39:27,083 तुम्ही जेव्हा पोलीस खात्यात बाँब टाकला तेव्हा आम्हा सगळ्यांनाच त्याने हादरवलं. 709 00:39:27,166 --> 00:39:29,417 तुम्हाला नाही का वाटत तुम्ही तुमचा दृष्टीकोण थोडासा बदलू शकाल? 710 00:39:32,917 --> 00:39:35,250 जोपर्यंत तुम्ही तुमचा नवा अशील बदलत नाही, तोपर्यंत तरी नाही, फ्रेंझ. 711 00:39:35,959 --> 00:39:37,375 आमचे नवीन अशील? मला समजलं नाही. 712 00:39:37,458 --> 00:39:41,291 दोन महिन्यांपुर्वी तुम्ही शिकागो पोलीस विभागात गेला होतात 713 00:39:41,375 --> 00:39:43,250 हे सांगण्याकरिता की तुम्ही त्यांचे देणे कमी करून देऊ शकता. 714 00:39:43,333 --> 00:39:44,417 हे खरं नाही. 715 00:39:44,500 --> 00:39:47,750 तुम्हाला असं म्हणायचं आहे का की, शिकागो पोलीस विभाग 716 00:39:47,834 --> 00:39:50,166 त्यांचा सगळा व्यवसाय तुमच्या संस्थेला देण्याविषयी विचार करत नाही म्हणून? 717 00:39:50,250 --> 00:39:52,583 नाही, मी असं म्हणतोय की माझ्या वकिलीचा ह्या गोष्टीशी काहीही संबंध नाही 718 00:39:52,667 --> 00:39:55,000 हे तर मी पोलिसांच्या कार्यकारी दलांशी संबंधित प्रकरणांचं काम घेतोय. 719 00:39:55,083 --> 00:39:56,667 इथे एक चीनी भिंत आहे. 720 00:39:58,875 --> 00:40:00,542 हे खरं आहे, फ्रेंझ? 721 00:40:01,166 --> 00:40:02,208 तू त्यांच्याशी ह्यासाठी बोलतो आहेस जेणेकरून 722 00:40:02,291 --> 00:40:04,000 तुला पोलिसांच्या प्रकरणामध्ये जरा सोपं पडावं 723 00:40:04,083 --> 00:40:06,000 जेणेकरून तुला पोलीस विभागाचं कंत्राट मिळेल? 724 00:40:06,083 --> 00:40:09,792 -नाही, ह्याचा काहीही संबंध नाही... -ह्याचाच तर सगळा संबंध आहे! 725 00:40:09,875 --> 00:40:10,959 इथे असलेल्यांपैकी कुणीही ह्यावर विश्वास 726 00:40:11,041 --> 00:40:12,500 ठेवणार नाही की मी इतका खालच्या पातळीवर उतरेन 727 00:40:12,583 --> 00:40:14,959 की इथल्या लोकांची बैठक मी त्या फायद्यासाठी वापरेन. 728 00:40:15,041 --> 00:40:16,667 मी विश्वास ठेवेन ह्यावर. 729 00:40:16,750 --> 00:40:19,166 -मला वाटतं मी पण ठेवेन. -मला वाटतं मी पण ठेवेन. 730 00:40:19,834 --> 00:40:21,917 -आम्ही येतो. -धन्यवाद. 731 00:40:22,000 --> 00:40:24,625 -अरे, बाप रे. -किती दुर्दैवी आहे हे. 732 00:40:29,166 --> 00:40:33,166 ओह, तुम्ही तयार आहात, मिस क्विन. काय ठरवलंय तुम्ही दोघांनी? 733 00:40:33,583 --> 00:40:35,792 महोदया, आम्ही कसल्याही निष्कर्षावर पोहोचलोच नाही आहोत. 734 00:40:36,917 --> 00:40:42,125 आमचं एकमत होऊच शकलं नाही कारण प्रतिपक्षाचे वकील अशा तारखेचा आग्रह करताहेत 735 00:40:42,208 --> 00:40:44,542 जी माझ्या बाळंतपणाची तारीख आहे. 736 00:40:44,917 --> 00:40:47,417 -अभिनंदन. -धन्यवाद. 737 00:40:48,291 --> 00:40:50,291 तुम्ही तुमची परिस्थिती तुमच्या 738 00:40:50,375 --> 00:40:51,375 प्रतिपक्षाच्या वकिलांना समजावून सांगितली का? 739 00:40:51,625 --> 00:40:55,750 नाही, कारण त्याची गरज नाही. त्यांना आधीपासूनच ती तारीख माहिती आहे. 740 00:40:56,083 --> 00:40:57,250 तो स्वतःच बाळाचा बाप आहे. 741 00:41:00,667 --> 00:41:01,792 हे खरंय, महोदया. 742 00:41:01,875 --> 00:41:04,000 प्रतिपक्षाचे वकील त्यांना माझ्या परिस्थितीबद्दल 743 00:41:04,083 --> 00:41:05,959 जे माहीत आहे त्याचा माझ्याविरुद्ध वापर करताहेत, 744 00:41:06,041 --> 00:41:08,625 म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी ते मला ह्यातून बाजूला करू पाहताहेत. 745 00:41:08,709 --> 00:41:09,959 महोदया... 746 00:41:10,041 --> 00:41:11,333 त्यांना मला ह्या प्रकरणातून बाजूला करायचं आहे कारण तसं 747 00:41:11,417 --> 00:41:13,166 झाल्याने त्यांना ही केस जिंकण्याची चांगली संधी मिळेल. 748 00:41:13,250 --> 00:41:14,125 हे तर... 749 00:41:17,458 --> 00:41:19,583 मि. मोरेलो, तुमची पाळी आहे. 750 00:41:20,834 --> 00:41:22,000 तुम्हाला काय वाटतं ते सांगा. 751 00:41:23,250 --> 00:41:24,542 मी तर विंनती करत होतो... 752 00:41:26,083 --> 00:41:27,000 महोदया... 753 00:41:28,667 --> 00:41:30,291 मी पुढची तारीख मागितली 754 00:41:31,125 --> 00:41:34,875 कारण आम्हाला, न्याय विभागाला, आमची बाजू तयार करण्यासाठी अजून वेळ हवा आहे. 755 00:41:38,166 --> 00:41:40,125 आमच्या बहुतेक वकिलांनी काम सोडलं आहे, 756 00:41:40,208 --> 00:41:43,959 आणि मला हे प्रकरण एका बाहेर पडणाऱ्या सहकाऱ्याकडून मिळालं. 757 00:41:44,041 --> 00:41:47,333 -मिस. क्विन जे सुचवताहेत... -ओह, मला लुका म्हणू शकतोस तू. 758 00:41:47,417 --> 00:41:49,750 न्यायाधीशांना आपण एकमेकांना एकेरी नावाने बोलतो हे माहितीये. 759 00:41:51,834 --> 00:41:52,917 तिचं बरोबर आहे. 760 00:41:54,083 --> 00:41:59,875 लुकाने जे सुचवलंय ते अगदीच दांभिक नसलं तरी अतिशय चुकीचं आहे, 761 00:41:59,959 --> 00:42:02,542 कारण आता ती तिच्या गर्भारपणाचा वापर करून तुमची 762 00:42:02,625 --> 00:42:05,792 सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेय, महोदया. 763 00:42:07,375 --> 00:42:08,583 हो, दिसतंय मला. 764 00:42:10,166 --> 00:42:14,959 अरे बाप रे. ह्या मुलांना खूपच चांगले आई-बाबा मिळताहेत. ठीक, चला तर. 765 00:42:15,792 --> 00:42:17,083 पुढची तारीख नाही. 766 00:42:17,583 --> 00:42:21,208 मि. मोरेलो, तुमच्या पुढची तारीख घेण्यामागची 767 00:42:21,291 --> 00:42:23,375 खरी कारणं कुणालाही कळू न शकणारी आहेत, 768 00:42:23,458 --> 00:42:27,125 पण ते चांगलं नाही आणि मी त्यासाठी मान्यता देणार नाही. 769 00:42:27,875 --> 00:42:30,083 तुमची केस तयार करा. तुमची सुनावणी सुरू राहणार आहे. 770 00:42:30,542 --> 00:42:32,333 आणि, मिस क्विन... 771 00:42:33,375 --> 00:42:35,250 तुमच्या गर्भारपणामुळे तुम्हाला 772 00:42:35,333 --> 00:42:37,750 सुनावणीदरम्यान कसलीही सहानुभूती मिळणार नाही. 773 00:42:37,834 --> 00:42:40,500 तेव्हा तुम्ही सुद्धा जय्यत तयारीत रहा. 774 00:42:41,500 --> 00:42:43,375 मी तुला ह्या प्रकरणातून बाहेर काढायला बघत नव्हतो. 775 00:42:43,458 --> 00:42:45,291 माफ करा, तुम्ही आधी वेळ घेतली होती का? 776 00:42:45,375 --> 00:42:47,125 मी न्यायालयात अजिबात डावपेच खेळत नव्हतो. 777 00:42:47,208 --> 00:42:49,959 मी तुला त्या केसमधून अजिबात काढू पहात नव्हतो. 778 00:42:50,041 --> 00:42:53,125 मग तू काय करत होतास? तिथे जा आणि पाठमोरा उभा रहा. 779 00:42:54,917 --> 00:42:57,041 -आपल्याला बाळ होणार आहे. -मला बाळ होणार आहे. 780 00:42:57,500 --> 00:43:00,166 -ही पुढची तारीख तुझ्याच फायद्याची होती. -हे, ईश्वरा. 781 00:43:00,250 --> 00:43:02,583 मला वाटलं नव्हतं की हे इतकं टोकाला जाईल, पण पाहतो तर काय. 782 00:43:02,667 --> 00:43:05,625 ही सुनावणी खूप तणावपूर्ण असणार आहे, ठीक? 783 00:43:05,709 --> 00:43:08,500 दुहेरी हत्याकांड, आणि आपण एकमेकांवर अक्षरशः ओरडणार आहोत. 784 00:43:08,583 --> 00:43:10,959 -मी आता वळू का, प्लीज? -नाही, अजिबात नाही. 785 00:43:11,834 --> 00:43:15,750 -हे, ईश्वरा. -तुला माहितीये हे किती तापदायक आहे? 786 00:43:15,834 --> 00:43:19,083 "कॉलिन, मला तुझ्या ह्या हळवेपणाबद्दल खरंच खूप काळजी वाटतेय. 787 00:43:19,166 --> 00:43:21,792 कदाचित तू ह्यातून बाहेर पडलीस तर तुझ्यासाठी बरं राहील." 788 00:43:22,125 --> 00:43:24,542 माझ्या पहिल्या वर्षातील प्रतिपक्षाच्या वकिलाचा तिच्या आयुष्यातील 789 00:43:24,625 --> 00:43:26,417 सगळ्यात महत्त्वाच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गर्भपात झाला होता. 790 00:43:26,500 --> 00:43:28,959 अरे, बाबा. आणि आता माझ्यासोबत पण तेच होणार आहे का? खरंच? 791 00:43:29,041 --> 00:43:32,583 आता मला, कृपया, थोडीशी काळजी करू देशील का? 792 00:43:33,083 --> 00:43:34,667 नाही, तू नाही करू शकत. 793 00:43:35,625 --> 00:43:39,834 तुझ्या गुणसुत्रांचा एक लहानसा भाग माझ्यात आहे, बस्स. 794 00:43:39,917 --> 00:43:41,667 लैंगिक सुख उपभोगलं. आपल्या दोघांनाही त्याबद्दल पश्चाताप आहे. 795 00:43:41,750 --> 00:43:46,959 -मला नाही. -ठीक. तो तुझा प्रश्न आहे. अच्छा. 796 00:43:51,417 --> 00:43:56,083 -मी इथे वेगळ्याच कारणासाठी आलो होतो.. -कॉलिन, मी बरी आहे, खरंच. 797 00:43:56,166 --> 00:43:58,041 तुम्ही लोक सध्या पीपर न्यूजचे प्रतिनिधित्व करताहात, हो ना? 798 00:43:58,125 --> 00:43:59,041 का? 799 00:43:59,125 --> 00:44:00,875 हां, कारण आम्ही अशा एका इसमाला अटक केलीयं जो, 800 00:44:00,959 --> 00:44:03,041 तुमच्या प्रकरणात तुम्हाला उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. 801 00:44:04,291 --> 00:44:06,208 -कोण? -नाही, तुला काही स्वारस्य नाही, हो ना? 802 00:44:06,291 --> 00:44:08,583 -नाही, आता मला आहे. -नाही, मी चाललो. 803 00:44:09,667 --> 00:44:10,542 कोण? 804 00:44:11,333 --> 00:44:15,041 लेसी हार्मन, अँटीफा कार्यकर्ता आणि सौदेबाज. 805 00:44:15,542 --> 00:44:18,208 तुला प्रतिवादी माहीत आहे का, डेनिस हनीकट? 806 00:44:18,291 --> 00:44:21,125 नाही, पण मला त्याच्याबद्दल माहिती आहे. मीच त्याचं घर जाळलं होतं. 807 00:44:21,542 --> 00:44:23,083 -हे ईश्वरा. -ती काय म्हणाली आत्ता? 808 00:44:23,959 --> 00:44:26,583 अच्छा, आपण आपले आवाज जरा हळू ठेऊया. 809 00:44:27,542 --> 00:44:30,291 -तुला त्याचं घर कसं सापडलं, लेसी? -ऑनलाईन. 810 00:44:30,375 --> 00:44:33,333 त्याच्या फेसबुक पेजवर रस्त्याच्या क्रमांकासहित घराचा फोटो होता. 811 00:44:33,417 --> 00:44:35,458 तुला ते पीपरन्यूज डॉट कॉमवर नाही सापडलं? 812 00:44:35,542 --> 00:44:37,959 नाही, तुम्ही मला पकडेपर्यंत तर मला हे नाव सुद्धा माहीत नव्हतं. 813 00:44:38,041 --> 00:44:42,000 -महोदय, माझे प्रश्न झाले. -अच्छा. अजून काही, मिस. वुड लुत्झ? 814 00:44:42,083 --> 00:44:45,875 -एक छोटीशी विश्रांती, महोदय. -जेवणाची सुटी. 815 00:44:50,500 --> 00:44:52,208 -तीन लाख. -नाही. 816 00:44:52,709 --> 00:44:55,458 आणि तुम्ही जर ही मागणी पुन्हा केली तर आम्ही त्यासाठी तुमच्यावर केस करू. 817 00:44:58,291 --> 00:44:59,458 मस्त जमलं. 818 00:45:03,625 --> 00:45:05,083 डायेन लॉखार्टचे ऑफीस. 819 00:45:06,542 --> 00:45:08,458 त्या सध्या आत नाहीत, मि. बोसमन. 820 00:45:08,542 --> 00:45:10,709 मी खरं तर तुझ्याशी बोलण्याकरिताच फोन केला होता, मारीसा. 821 00:45:10,792 --> 00:45:13,125 -मला? का? -धन्यवाद देण्याकरिता. 822 00:45:13,375 --> 00:45:16,166 मेंडेलसनची ती माहिती काढण्याचं काम एकदम मस्त झालं. 823 00:45:16,750 --> 00:45:19,625 हां, ते तर काय, माझं कामच... 824 00:45:19,709 --> 00:45:25,083 -मारिसा, माझ्या "धन्यवाद" चा स्वीकार कर. -अच्छा, सुस्वागतम. 825 00:45:25,291 --> 00:45:27,000 तुझ्या पगारात दहा टक्के वाढ झालीयं. 826 00:45:28,375 --> 00:45:31,375 -तुम्ही... खरंच? -खरंच खूप चांगलं काम केलंस. 827 00:45:32,834 --> 00:45:36,083 धन्यवाद, मि. बोसमन. ही माझी पहिली पगारवाढ आहे. 828 00:45:36,166 --> 00:45:38,667 पुढे होणाऱ्या कित्येक वाढींपैकी पहिली. मला खात्री आहे. अच्छा. 829 00:45:42,750 --> 00:45:45,291 मग, जे.डी. चं काय झालं? 830 00:45:46,125 --> 00:45:47,041 तुम्ही केलय ते. 831 00:45:50,000 --> 00:45:51,000 उठू नका. 832 00:45:53,125 --> 00:45:54,250 ऍड्रियन, कसे आहात? 833 00:45:56,458 --> 00:45:58,834 -उत्तम. -उत्तम, छान. 834 00:45:59,125 --> 00:46:02,250 हे बघ, नेटवर्कमधील सगळ्यांनाच तू आवडतोस. तू हुशार आहेस, स्पष्टवक्ता आहेस. 835 00:46:02,333 --> 00:46:04,959 जेव्हा तू चर्चा गरम करतोस तेव्हा आम्हा सगळ्यांनाच ते आवडतं. 836 00:46:06,000 --> 00:46:08,000 आक्रमक कृष्णवर्णीय होतो आहेस का? 837 00:46:08,083 --> 00:46:09,834 हे ईश्वरा, नाही. हे अतिशय साचेबद्ध काम आहे. 838 00:46:09,917 --> 00:46:13,250 ठीक आहे तुझ्या पद्धतीने जा. लोकांना आजकाल काहीही केलेलं आवडतं. 839 00:46:13,333 --> 00:46:16,250 त्यांना ते काय विचार करताहेत तेच बोलणारा कुणीतरी नेहेमीच आवडतो. ठीक. 840 00:46:16,333 --> 00:46:18,417 आम्हा सगळ्यांना तो एक क्षण हवा होता. 841 00:46:19,166 --> 00:46:21,959 मी तुला बाहेर भेटतो. हा प्रकार छान आहे. 842 00:46:24,875 --> 00:46:28,000 वंशवाद हा एकाच मार्गाने का होतो नेहेमी? मलाही तेच माहिती करून घ्यायचंय. 843 00:46:28,083 --> 00:46:31,917 मला नेहेमीच श्वेतवंशीयांविरुद्धच वंशवाद उभा राहिलेला दिसतो, अगदी दररोज. 844 00:46:32,000 --> 00:46:34,125 तरीही हे दाखवणारा मी सुद्धा वंशवादीच असतो? 845 00:46:34,208 --> 00:46:35,667 ऍड्रियन, तुमचं मत काय आहे? 846 00:46:36,959 --> 00:46:39,500 -कशावर? -आत्ता चक जे म्हणाले त्यावर. 847 00:46:39,792 --> 00:46:43,875 -वंशवाद हा नेहेमी एकतर्फीच असतो का? -मला वाटतं हे त्याचं मत झालं. 848 00:46:43,959 --> 00:46:45,250 तुमच्या संस्थेकडे पहा, ऍड्रियन. 849 00:46:45,333 --> 00:46:47,083 तुम्हाला बोली न लागणाऱ्या कंत्राटांमध्ये फायदा 850 00:46:47,166 --> 00:46:49,000 होतो कारण तुम्ही आफ्रिकी-अमेरिकन संस्था आहात. 851 00:46:49,083 --> 00:46:51,667 आता, एक श्वेतवर्णीय वकील ह्या नात्याने मी त्याबद्दल काय विचार करायला पाहिजे? 852 00:46:52,500 --> 00:46:54,417 मला नाही माहीत. 853 00:46:54,500 --> 00:46:58,625 मला वाटतं चक इथे दुटप्पीपणाबद्दल बोलतोय, ऍड्रीयन. काहीतरी बोला. 854 00:46:58,709 --> 00:47:01,208 आपण ह्या कार्यक्रमामध्ये ह्यावर पुर्वी बोललेलो आहोत. 855 00:47:01,291 --> 00:47:03,083 तुमच्याकडे काही आफ्रिकी-अमेरिकी कागदं होती 856 00:47:03,166 --> 00:47:04,625 ज्यावर असभ्य शब्द लिहीलेले होते आणि ते शब्द होते,, 857 00:47:04,709 --> 00:47:06,709 पण कोकॅशियन नाही बोलू शकत ते. 858 00:47:06,792 --> 00:47:08,875 -मग म्हण पाहू. -काय म्हणायचं? 859 00:47:09,583 --> 00:47:10,667 तो शब्द म्हण जो तुला म्हणायचा आहे. 860 00:47:10,750 --> 00:47:12,000 मी असं नाही म्हणालो की मला तो म्हणावा वाटतोय. 861 00:47:12,083 --> 00:47:13,125 मी फक्त एवढंच म्हणालो की मी नाही म्हणू शकत. 862 00:47:13,208 --> 00:47:15,083 नक्कीच, म्हणू शकतोस. म्हण पाहू. आत्ता म्हण. 863 00:47:16,458 --> 00:47:19,750 -मी म्हणतो ना तुझ्यासोबत. -हा तर दांभिकपणा झाला. 864 00:47:19,834 --> 00:47:20,834 तुम्हाला माहितीयं आपण नाही करू शकत. 865 00:47:20,917 --> 00:47:26,125 नक्की, तू म्हणू शकतोस की. ही अमेरिका आहे. तुम्ही दोघंही म्हणा. 866 00:47:28,125 --> 00:47:29,625 -ठीक आहे, मला वाटतं आपण पुढे जाऊया. -का? 867 00:47:29,709 --> 00:47:33,417 पण म्हणायचं असताना पुढे तरी कशाला जा, तुम्हा दोघांनाही हे म्हणायचंय बरोबर ना? 868 00:47:35,291 --> 00:47:36,750 सगळेच सोबत म्हणूया. 869 00:48:05,875 --> 00:48:06,917 खड्यात जा. 870 00:48:09,750 --> 00:48:11,792 मी खूप त्रास दिला का तुला? 871 00:48:16,917 --> 00:48:19,583 -मला नाही वाटत त्याला मी आवडतो. -छान केलंत. 872 00:49:20,041 --> 00:49:21,959 द्वारे उपशिर्षक अनुवाद: चित्रेश देशमुख